पश्चिम महाराष्ट्र

ट्रक चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा

ट्रक चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

इचलकरंजी (कोल्हापूर) ः ट्रक चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखने केला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून तब्बल सहा ट्रक हस्तगत केले आहेत. अन्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबतची माहिती अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकारांना दिली.

उपअधीक्षक गणेश बिरादार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव उपस्थित होते. याप्रकरणी जमीर इब्राहीम हारचिकर (वय 43, सुभाषनगर, कोल्हापूर) याला अटक केली आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या टोळीतील अन्य दोघांची नावे निष्पन्न झाले असून त्यांच्या मागावर पोलिसांचे पथक आहेत. बनावट चावीचा वापर करून चोरलेल्या ट्रकचे चेस नंबर बदलण्यात येत होते. त्यानंतर पुन्हा या ट्रकांची विक्री करण्यात येत होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. 
हेरले (ता. हातकणंगले) येथून चोरीस गेलेला ट्रक अंकली (ता. चिकोडी) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने हारचिकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये साथीदाराच्या मदतीने 4 जानेवारीला ट्रकची चोरी केल्याचे कबूल केले. याबाबतचा गुन्हा हातकणंगले पोलिसांत नोंद आहे.

कामगिरीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली महेश कोरे, वैभव दड्डीकर, रणजीत पाटील, संजय इंगवले, महेश खोत, फिरोज बेग, संदीप मळघणे, अजिंक्‍य घाटगे, सायबर पोलीस ठाण्याकडील अमर वासुदेव, सचिन बेंडखळे यांनी भाग घेतला. 

निपाणीतून पाच ट्रक हस्तगत 
निपाणी येथे चोरीतील पाच ट्रक असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाच ट्रक हस्तगत केले आहेत. त्यांच्या मूळ मालकांचा शोध पोलिस घेत आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या 6 ट्रकची किमत 74 लाख इतकी आहे. 

विल्हेवाट लावण्याची पद्धत 
ट्रकची चोरी केल्यानंतर बॉडीमध्ये बदल करण्यात येत होता. चेस नंबर खोडून नवीन नंबर टाकला जात होता. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून चोरलेल्या ट्रकची विक्री करण्यात येत असल्याचे तपासात पुढे आले आहे. काही ट्रक तोडून भंगारात घालतल्याची शक्‍यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT