Daru
Daru 
पश्चिम महाराष्ट्र

यांना पडलंय दारू गाळायचं अन त्यांची मसलत चाललीय आज बसायचं का

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः कोरोनाच्या कहरामुळे माणसांचा माणुसकीवरील विश्वास उडाला आहे. इतकी भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, काहीजणांची दारू गाळायचं काम सुरू आहे. अजूनही काही लोक व्यसन करण्यातच दंग आहेत. त्यांना देशासमोरील भयानक परिस्थितीचे काहीच देणेघेणे नाही.

शहरासह तालुक्यातील खंडाळा, नांदुर, गोंधवणी, पढेगाव परिसरातील गावठी दारुच्या भट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने काल (ता 2) छापे टाकुन सुमारे चार लाख तीन हजार रुपयांचे गावठी दारुचे कच्चे रसायन जप्त केले. पोलिसांनी याप्रकरणी तालुक्यातील विविध ठिकाणंच्या तेरा जणांविरुद्ध काल रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविले.
पोलिसांनी सुनिता फुलारी (वय 40), मंदा फुलारी (वय 50), मंदा गायकवाड (वय 45. सर्व रा. साईनगर, प्रभाग तीन), सुनिल गवळी (वय 39,प्रभाग दोन), पप्पु पवार (वय 30. रा. सुतगिरणी फाटा), उषा काळे (वय 45 रा. कदमवस्ती, गोंधवणी), इंदुबाई जाधव (वय 57. रा. सरस्वती कॉलनी), विजुबाई जाधव (वय 70), विमल जाधव (वय 40), संदीप जाधव (वय 36, तिघे रा. नांदुर बु), राजेश महाजन (वय 25 रा.खंडाळा), संतोष गिरहे (रा.राजुरी), रवी माळी (वय 24 रा.पढेगांव) यांच्याविरुद्ध कारवाई करुन चार लाख तीन हजार रुपयांचे गावठी दारुचे कच्चे रसायण जप्त केले. 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन काल (ता 2) रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. सदर करावाई पोलीस अधिक्षक अखिलेश कुमारसिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT