Islampur police warn of spreading religious misconceptions over Whats App
Islampur police warn of spreading religious misconceptions over Whats App  
पश्चिम महाराष्ट्र

व्हाॅट्स अॅप वरुन धार्मिक गैरसमज पसरवणाऱ्यांना इस्लामपूर पोलिसांचा कारवाईचा इशारा...

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) - कोरोनाबाधित लागण झालेल्या एका विशिष्ट समाजाच्या नावे बदनामीकारक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व्हाॅट्स अॅप ग्रुपच्या अॅडमीन विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित लोकांनी हा प्रकार थांबवावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे. 

इस्लामपूर शहरात 23 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये विशिष्ट समाजातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यावरून धार्मिक भाष्य करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे. आधीच लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून कोरोनाविषयी घबराट वाढली आहे. अशा परिस्थितीत हे घातक ठरण्याची शक्यता आहे.

इस्लामपूर पोलीसांच्या वतीने सर्व व्हाॅट्स अॅप ग्रुपच्या अॅडमीन व ग्रुप सदस्यांना पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही ठराविक ग्रुपमधील काही अतिउत्साही सदस्य कोरोना संसर्गाबाबत ठराविक धर्माच्या बाबतीत गैरसमज निर्माण करणारे मेसेज प्रसारित करत आहेत. त्यामुळे समाजात दूषित वातावरण तयार होवून कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर सेलमार्फत कार्यवाही सुरू केलेली आहे. पोलीस प्रशासन कोरोना संसर्गजन्य परिस्थिती बंदोबस्तात जे जे वहाॅटसअप सदस्य असे मेसेज प्रसारित करीत आहेत, तसेच त्या त्या नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये गैरसमज पसरवत आहेत, त्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध प्रशासनाने कारवाई सुरू केली असून संबंधितांनी आपल्या मत प्रदर्शनावर आवर घालावा, अन्यथा कारवाई अटळ आहे, असा इशारा इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT