पश्चिम महाराष्ट्र

मराठा आरक्षणाला विरोध थांबवावा

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ‘सवर्णांना १० टक्के आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने ओबीसीतील काही संघटनांनी मराठा आरक्षणाला जो विरोध केला होता. तो थांबवावा’. त्यातून ७२ हजार जागांवरील मेगा भरतीतील अडथळे दूर होतील, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले. दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्या विरोधात याचिका दाखल झाल्या. १६ टक्के आरक्षणाचा कायदा झाल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. राज्यात मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचा लाभ मराठा समाजातील तरुणांना मिळणार आहे. मराठा आरक्षणाविरोधात काही मंडळींनी स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास यश मिळाले नाही.

केंद्र सरकारने सवर्णांना १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यासंबंधीचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. राज्यसभेतही ते मंजूर होईल. त्याचेही कायद्यात रुपांतर होईल. त्यातून ५० टक्के आरक्षणाला बळकटी येईल. या निर्णयामुळे कोणाचेही आरक्षण बळकाविण्याची भीती संपली आहे. ओबीसीतील काही संघटनांनी विरोध केला होता. तो थांबवावा. त्यामुळे समाजात दुही निर्माण होणार नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मेगा भरतीचा लाभ मराठा तरुणांना मिळेल.

...अन्यथा कदम यांना फिरकू देणार नाही
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खासदार संभाजीराजे यांच्यासंबंधी चुकीचे विधान केले आहे, त्यासंबंधी माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी; अन्यथा त्यांना कोल्हापुरात फिरकू देणार नाही, असा इशारा स्वप्नील पार्टे यांनी दिला. कदम यांनी विरोधात आणि सत्तेत असताना मराठा आरक्षणासाठी काय केले? याचे उत्तर द्यावे. छत्रपती घराणे या मानाच्या गाद्या आहेत. त्यांच्याविषयी बोलताना आपली कुवत ओळखावी. कदम कोल्हापुरात येतील, त्यावेळी सकल मराठा समाजातर्फे निदर्शने केली जातील, असेही पार्टे यांनी सांगितले. या विधानाचा तसेच राणे समितीने कोणताही सर्व्हे केला नाही, असे विधान केले जातेय. संभाजीराजे व राणे कुटुंबिय आरक्षणासाठी मेहनत घेत असताना कदम यांनी राजकारणासाठी चुकीचे शब्द वापरले, त्याचाही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT