Jalgaon residents oppose purchase of BMTC scrap buses belgaum
Jalgaon residents oppose purchase of BMTC scrap buses belgaum sakal
पश्चिम महाराष्ट्र

बीएमटीसी भंगारात काढल्या जाणाऱ्या बसेस खरेदी करण्यासाठी जळगावकरांचा विरोध

विनायक जाधव

बेळगाव : बंगळूर महानगर परिवहन मंडळाकडून (बीएमटीसी) भंगारात काढल्या जाणाऱ्या बसेस खरेदी करण्यासाठी वायव्य परिवहन महामंडळाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र याला आता जळगावकर यांचा विरोध होऊ लागला आहे. बीएमटीसी आठ ते नऊ लाख किलोमीटर धावलेल्या आपल्या ताफ्यातील २५ हजार बसेस भंगारात काढणार आहे. या बसेस ५० हजार ते १ लाख रुपयांना खरेदी करून त्यांचे दुरुस्ती करीत पुन्हा त्या वापरण्याचा परिवहन मंडळाचा मानस आहे. या बसेस हुबळी धारवाड आणि बेळगाव विभागाला पुरविल्या जाणार आहेत. आज सकाळी काही वृत्तवाहिन्यांनी या बाबतची बातमी प्रसिद्ध करताच काही संघटनांनी याला विरोध केला असून याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांना पत्र पाठविले जाणार आहे. राज्य सरकार उत्तर कर्नाटका कडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनानी केला आहे.

बेळगाव विभागाला सुमारे १०० बसेसची कमतरता भासत आहे. मागील दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे वायव्य परिवहन महामंडळ आर्थिक तोट्यात सापडले आहे. संसर्ग काळात बस सेवा ठप्प राहिल्याने शासनाकडूनच परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले होते. परिवहन मंडळाकडे अनुदानाची कमतरता असल्याने नव्या बसेसची खरेदी ठप्प झाली आहे. त्यामुळे बीएमटीसीकडून भंगारात काढण्यात येणार्‍या बसेसची वायव्य परिवहन मंडळाकडून खरेदी केली जाणार आहे.

परिवहन मंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता हा निर्णय घेतला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ८ ते ९ लाख किलोमीटर धावलेल्या बसेस वापरण्यास योग्य नसल्यानेच बीएमटीसीकडून त्या भंगारात काढल्या जात आहेत. मात्र अशा बसेस खरेदी करून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार वायव्य परिवहन मंडळाकडून घडणार आहे. त्यामुळे अशा बसेस खरेदी केल्या जाऊ नयेत. त्याऐवजी वायव्य परिवहन मंडळाला शासनाने अनुदान उपलब्ध करून देऊन नव्या बसेसची खरेदी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT