Kadegawat Mahavitaranasamore Vadhiv Viz Bilaunchi
Kadegawat Mahavitaranasamore Vadhiv Viz Bilaunchi 
पश्चिम महाराष्ट्र

कडेगावात महावितरणसमोर वाढीव वीज बिलांची होळी 

संतोष कणसे

कडेगाव : कोरोना महामारीच्या कालावधीतील वीज बिले माफ करावी. तसेच वाढीव बिले कमी करावीत त्याचबरोबर शेतीसह शहरात अखंडित वीज पुरवठा करावा. या मागणीसाठी आज सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी येथे महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. 

कोरोना महामारीच्या कालावधीत नागरिक व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. अतिवृष्टी व अवकाळीमुळे पिकांचे देखील मोठे नुकसान झाले त्यामुळे कोरोनाकाळातील वीज बिल माफ करावीत तसेच वाढीव बिले कमी करावीत. कडेगाव शहरासह शेतीला केला जाणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे पाणी असून देखील पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे सुरळीत वीज पुरवठा करावा. शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्यामुळे लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा सुस्थितीत करणाव्यात. शेती पंपा करिता बंद असलेली नवीन वीज जोडणी पुन्हा सुरू करावी. 

विजेच्या समस्याबाबत हेल्पलाईन नंबर सुविधा सुरू करण्यात यावी. कडेगाव हे तालुक्‍याचे ठिकाण आहे. त्यामुळे ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी कडेगावला स्वतंत्र उपकेंद्र व अन्य योग्य ती व्यवस्था करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या मागण्यांची योग्य दखल घ्यावी. अन्यथा 22 डिसेंबर रोजी मोर्चा व तीव्र बोंबमारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. देशमुख यांनी यावेळी दिला.

संतोष डांगे, दीपक न्यायनीत, युनूस पटेल, जीवन करकटे, विठ्ठल खाडे, शशिकांत रासकर, राजेंद्र थोरात, प्रकाश शिंदे, खन्ना शेख, युवराज देसाई, युवराज मोरे, अनिल देसाई, अनिल जरग, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र राऊत, वसंत इनामदार, विठ्ठल खाडे, खाशाबा नायकवडी, दत्तात्रय भोसले, रघुनाथ गायकवाड, मोहन जाधव आदी उपस्थित होते.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT