पश्चिम महाराष्ट्र

पाणी योजना, रस्ते, पुलांच्या कामांना महत्त्व

सचिन शिंदे

कऱ्हाड - मुख्यमंत्री असताना एक हजार २६१ कोटींची विकासकामे करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदारकीच्या कालावधीत गेल्या तीन वर्षांत सुमारे ५१ कोटी ८० लाखांची कामे केली आहे. शहरी व ग्रामीण भागाचा समन्वय साधताना त्यांनी ठेवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसते. 

अनेक गावांतील पाणी योजना, रस्त्यांसह गावांना जोडणाऱ्या पुलाला अधिक महत्त्व देत त्यांनी ही कामे मार्गी लावली आहेत. कृषी महाविद्यालयासाठी पुरवणी 

अर्थसंकल्पातून सात कोटींची तरतूद करण्यात त्यांना यश आले आहे. ग्रामीण भागातील पाणी व रस्ता प्रश्न, तर शहरी भागातील विकास आराखड्यास कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे विकासाचा समन्वय साधत त्यांनी केलेल्या विकासकामात सातत्य राहिले आहे. आमदार चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेली विकासकामे प्रत्यक्ष सुरू आहेत. त्यात लहान पुलांच्या कामासाठी तीन कोटी ८० लाख निधी मिळाला आहे. प्रमुख जिल्हा मार्गांच्या कामासाठी ३५ कोटी ८४ लाखांची तरतूद झाली आहे. वेगवेगळ्या राज्यमार्गावरील दळणवळ सुलभ व्हावे यासाठी १२ कोटी १५ लाख रुपयांचा निधी त्यांनी राज्य सरकारकडून आणला आहे. तुळसण येथे पूल, दक्षिण मांड नदीवर मनव ते नांदगाव नदीवरील पूल ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कामे ठरली आहे. त्यासाठी तीन कोटी ८० लाकांचा निधीही आणला आहे. पाचवडेश्वर ते शेणोली स्टेशन रस्ता रुंदीसाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून पर्यायी मार्ग होणार आहे. त्यासाठी एक कोटी ५० लाख रुपयांचा निधी आहे. मलकापूर नगरपंचायतीचे मंजूर शहर विकास योजनेतील भूसंपादनासाठी ३२ कोटींची तरतूद केली आहे. वेगवेगळ्या रस्त्याच्या कामांसाठी दोन कोटी ३४ लाख रुपये मंजूर आहेत. डिचोली ते शेणोली स्टेशन रस्ता सुधारण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर आहे.

किती गावांचे प्रश्न घेऊन तुम्ही मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचे उत्तर नकारात्मक आहे. आमदार म्हणून कऱ्हाड ते चिपळूण रेल्वेमार्गावर आपण भूमिका मांडत आहात. मात्र, त्या प्रश्नासाठी ते कोणाला भेटले आहेत, हे सांगू शकत नाहीत. 
- अतुल भोसले, युवा नेते, भाजप

काय कमावले...
पाचवड फाटा ते शेडगेवाडी फाट्यापर्यंतचा रस्ता चौपदीरकरण 
येणके ते पोतले गावांना जोडणारा पूल 
मलकापूर ड्रेनेज योजना कार्यान्वित 
कृषी महाविद्यालयासाठी पुरवणी अर्थसंकल्पातून सात कोटींचा निधी 
डिचोली ते शेणोली स्टेशन रस्त्यासाठी पाच कोटी रुपये 

आगामी नियोजन
कऱ्हाड ते चिपळूण रेल्वे मार्ग होण्यासाठी प्रयत्न 
प्राथमिक शाळांच्या इमारती व शिक्षक विकसित करण्यास प्राधान्य 
वडगाव हवेलीतील देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT