पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड दक्षिणमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे!

हेमंत पवार

कऱ्हाड - विधासभेचे घोडा मैदान अजून लांब असतानाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात शासनाकडून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेतल्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणचे वातावरण ढवळून निघाले आहे, तर विलासराव पाटील-उंडाळकर गटाने मात्र श्रेयवादात न पडता ॲड. उदयसिंह पाटील यांना विधानसभेत पाठवण्यासाठी गावोगावी रान तापवून कार्यकर्ते ‘चार्ज’ करण्यास सुरवात केली आहे. 

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण हे करत असल्याने राज्याच्या राजकारणात हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. या मतदारसंघातील राजकारणाकडे राज्याचे लक्ष लागून असते. या मतदारसंघाचे गेली ३५ वर्षे माजी मंत्री उंडाळकर यांनी नेतृत्व केले. त्यांच्यानंतर मागील निवडणुकीत माजी मुख्यमंत्री चव्हाण, श्री. उंडाळकर व अतुल भोसले यांनी निवडणूक लढवली. तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार असल्याने कऱ्हाड दक्षिणची निवडणूक ‘हॉट’ बनली होती. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ उंडाळकर आणि चव्हाण गटात असणारी दरी आणखीच वाढली. मात्र, मध्यंतरी झालेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि उंडाळकर गटाने मनोमिलन घडवत एकत्र येत पालिकेची सत्ता ताब्यात ठेवली. काँग्रेसच्या हातावर दोन्ही गट लढले तर भोसले गट तेथे भाजपच्या कमळावर लढला. मात्र, भोसले गटाला तेथे अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, तेथे उंडाळकर आणि चव्हाण गटाचे मनोमिलन झाले, हा दोन्ही गटांसाठी ‘प्लस पॉइंट’ ठरला. 

शासनाकडून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. त्या कामांचे श्रेय घेण्यावरून सध्या चव्हाण आणि भोसले गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भोसले गटाने मतदारसंघात विकासकामे जाहीर झाल्याची माहिती पत्रकाव्दारे वृत्तपत्रांना दिली. त्या कामांचे खंडण करण्यासाठी आणि ती कामे लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्याप्रमाणे मंजूर झाली आहेत, याची माहिती देण्यासाठी चव्हाण गटाने काल पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी विकासकामे मंजुरीसाठी प्रयत्न केले असतील तर पुरावे घेऊन समोर या, असे जाहीर आव्हान भोसले गटाला दिले आहे. मात्र, भोसले गटाने कामांची भूमिपूजने करण्याचा सपाटा लावला आहे. तर उंडाळकर गटाच्या सैन्याने मात्र विकासकामांच्या श्रेयवादात न पडता ॲड. उदयसिंह पाटील यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन करत गावोगावी रान तापवून कार्यकर्ते ‘चार्ज’ करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणचे वातावरण ढवळून निघाले आहे. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT