Karamjai Dam Overflow sakal
पश्चिम महाराष्ट्र

Dam Overfull : करमजाई, अंत्री बुद्रुक धरणे फुल्ल; ‘चांदोली’ ५३, ‘मोरणा’ ६० टक्के भरले

शिराळ्यासह तालुक्यात पावसाने काल रात्रीपासून जोरदार हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

शिराळा/ पुनवत - शिराळ्यासह तालुक्यात पावसाने काल रात्रीपासून जोरदार हजेरी लावली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम सुरू असल्याने व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील ओढे, नाले नैसर्गिक उमाळ्याने प्रवाहित झाल्याने धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढू लागली आहे. करमजाई, अंत्री बुद्रुक ही दोन धरणे १०० टक्के भरली आहेत. पाणी सांडव्यातून बाहेर पडले आहे. परिणामी शिराळा शहरानजीक असलेल्या महत्त्वपूर्ण मोरणा धरणात पाण्याची आवक मोठ्या वाढल्यामुळे साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

सध्या चांदोली धरणात ७१५७ क्युसेकने आवक सुरू असल्याने आज चांदोली धरणात ५३ टक्के, म्हणजे १८.२३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाने एक हजार ४९ मिलिमीटर नोंदीचा टप्पा पूर्ण केला आहे. मोरणा धरण १४ वरून ६० टक्के भरले असून पावसाचा असाच जोर कायम राहिला तर दोन ते तीन दिवसांत १०० टक्के भरेल.

शिराळा पश्चिम व उत्तर भागात पावसाचा जोर वाढला आहे. उत्तर भागातील करमजाई, मानकरवाडी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे, सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्यामुळे या दोन्ही धरणांतील पाणी मोरणा धरणात येत असल्याने साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शिराळा शहर, एमआयडीसीसह नदीकाठच्या बिऊर ते मांगलेपर्यंत गावांचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

वारणा, मोरणा नदीकाठी असणाऱ्या सर्व गावांना नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सर्वच नळपाणी पुरवठा योजनांचे जॅकवेलही नदीकाठावरच आहेत. वीस दिवसांपूर्वी नदीतील पाण्याने तळ गाठला होता. अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडले होते. याचा विपरीत परिणाम नदीकाठावरील गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांवर झाला होता.

नदीतील पातळी खालावल्याने नळ पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये अपेक्षित साठा होत नव्हता. तेव्हा, ऐन पावसाळ्यात नदीकाठावरील गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. अनेक गावांत एक दिवसआड पाणी पुरवठा केला जात होता. पाणी टंचाईमुळे नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी खासगी कूपनलिका, विहिरींचा आधार घ्यावा लागत होता.

मात्र, गेली महिनाभर पडलेल्या दमदार व जिरवणीच्या पावसाने व शुक्रवारपासून (ता. १२) पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे ओढे, नाले, वारणा व मोरणा नद्या प्रवाहित झाल्या आहेत. तालुक्यातील ४९ पाझर तलावांतील पाणीसाठाही झपाट्याने वाढायला लागला आहे.

चांदोली धरण परिसरात आजअखेर तीनवेळा अतिवृष्टी झाली असून धुव्वाँधार पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासांत आजअखेर १०४९ मिलिमीटर पाऊस पडला असून गेल्या २४ तासात ५६ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. वारणा, मोरणेसह शिराळा शहरातून गेलेली तोरणा नदी पावसाच्या पाण्याने प्रवाहित झाली आहे. डोंगर, दरी-खोरे हिरवाईने नटले असून धबधबे सुरू झाले असल्याने पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

धरणांतील पाणीसाठा

  • चांदोली - ५३ टक्के

  • मोरणा - ६० टक्के

  • वाकुर्डे बुद्रुक करमजाई - १०० टक्के

  • अंत्री बुद्रुक - १०० टक्के

  • शिवणी - १५ टक्के

  • टाकवे - ५५ टक्के

  • रेठरे धरण - ५

  • कार्वे - १२ टक्के

चार दिवसांत अतिवृष्टी

  • २ जुलै - ९० मिमी

  • ३ जुलै - १०५ मिमी

  • ६ जुलै - ६५ मिमी

  • ७ जुलै - ७९ मिमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT