
काही लोक पर्यावरण वाचवण्याच्या केवळ बाता मारतात. पण काही त्यासाठी कार्य कार्य करून मोकळेही होतात. अशाच पद्धतीची कार्यपद्धती असलेले उत्तर प्रदेश सरकारचे धडाकेबाज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (रविवार) गोरखपूर जिल्ह्यातील खानिमपूर गावात टोरेंट गॅस आणि टोरेंट पॉवर यांच्या द्वारे स्थापन केलेल्या राज्यातील पहिल्या आणि देशातील दुसरे हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी, स्वच्छ ऊर्जा परिवर्तनात हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल असे ते म्हणाले.
या प्रकल्पामध्ये नैसर्गिक वायूपासून हरित हायड्रोजन तयार करण्यात येईल. या हरित हायड्रोजनचा वापर वाहनांचे आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या इंधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जाईल. हा राज्यातील पहिलाच हरित हायड्रोजन प्रकल्प आहे. असा अंदाज आहे की या प्रकल्पामुळे दरवर्षी 500 टन कार्बन उत्सर्जन रोखता येईल.
हरित हायड्रोजन ही "भविष्यातील ऊर्जा"चे प्रतीक आहे आणि जैवविविधतेचे संरक्षण, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि मानवी आरोग्यात सुधारणा करण्यात याची निर्णायक भूमिका असेल, असेही ते म्हणाले.