6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

Kashi Rudras UP Premier League 2025 match result : उत्तर प्रदेश प्रीमियर लीगमध्ये भारतीय गोलंदाज शिवम मावीने एक भन्नाट खेळ करून दाखवला. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मावीने केवळ १९ चेंडूत अर्धशतक ठोकत काशी रुद्राज संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
Shivam Mavi
Shivam Maviesakal
Updated on
Summary
  • उत्तर प्रदेश ट्वेंटी-२० लीगमध्ये शिवम मावीने १९ चेंडूत अर्धशतक झळकावत फलंदाजीत कमाल केली.

  • काशी रुद्राज संघाकडून खेळताना त्याने २५७ च्या स्ट्राईक रेटने ५४ धावांची खेळी केली.

  • त्याच्या खेळीतल्या ३६ धावा फक्त षटकारांच्या मदतीने आल्या.

From No.8 to Hero: Shivam Mavi’s 19-Ball 50 Lights Up UPT20League : भारतीय संघाचे गोलंदाज आता फलंदाजीतही जोर लावताना दिसत आहेत. इंग्लंड दौऱ्यावर एकीकडे यजमानांचे फलंदाज डोकेदुखी वाढवत होते, तेच भारताचे शेपूट पटापट गुंडाळले जात होते. त्यामुळेच आता भारतीय खेळाडू गोलंदाजीसह फलंदाजीतही दम दाखवू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसापूर्वी मोहम्मद शमीनेही फलंदाजीचा सराव करतानाचा फोटो पोस्ट केला होता. आज तर भारताच्या एका गोलंदाजाने आठव्या क्रमांकावर येताना १९ चेंडूंत अर्धशतक झळकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com