Khatav Police station is overloaded with seized vehicles
Khatav Police station is overloaded with seized vehicles 
पश्चिम महाराष्ट्र

वाळूने घेरलीत खटावची पोलीस ठाणी

अंकुश चव्हाण

कलेढोण (सातारा) : खटाव तालुक्यात वाळू माफियागिरी वाढल्याने कारवाई केलेल्या वाहनांनी वडूज, पुसेगाव, औंध , मायणीतील पोलीसठाणी 'ओवर फ्लो' झाली आहेत. मुद्देमालासह कारवाईत ताब्यात घेतलेल्या वाहने दंडाची रक्कम भरून नेण्यास वाळूमाफिया दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस ठाण्यात पाय ठेवायला जागाच उरली नाही. त्यामुळे तालुक्यातील वाळूच्या साठ्यांबरोबर वाळू माफियांनी पोलीसठाणी घेरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

खटाव तालुक्यातील येरळानदीचे पात्र , चितळी-शेडगेवाडी , मायणीतील कानकात्रे ओढा, वाघबीळ व शिंदेवाडा, विखळे-शिंदेवाडी ओढा, पुसेगावच्या बुध व खटाव, औंधच्या चोराटे व औंध भागातून छुप्या पद्धतीने वाळू उपसा सुरु असतो. त्यात शालेय तरुणांपासून राजकीय वरदहस्त असलेल्या वाळू माफियांचा समावेश आहे. वाळू उपसावर असलेल्या बंदीमुळे वाळूला आलेला सोन्याचा भाव, झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग व कमी वयात हातात पैसा उभा रहात असल्याने या बेकायदेशीर व्यवसायाकडे तरुणांचा ओढा वाढला आहे. रात्री-अपरात्री प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील पोलीसठाणी जेसीबी, डंपर, वाळू उपसा करणारे इंजिन, ट्रक्टर, टेंपो, छोटी पिक-अप अशा वाहनांनी 'ओवर फ्लो' झाली आहेत.

वडूज येथील पोलीस ठाणे व जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर उभा केलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे तालुक्यातून कामानिमित कार्यालयाकडे येत असलेले नागरिक वाहने पाहून आश्यर्य व्यक्त करीत आहेत. तर मायणी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेली वाहने धान्य गोदाम परिसरात, रस्त्यावर व खासगी जागेत उभा केली आहे. त्यात पिक-अप वाहनांचा समावेश अधिक आहे. तर औंधच्या पोलीस ठाण्यात डंपर या वाहनांना समावेश असल्याने तालुक्यात वाळू चोरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करत पोलीसठाणी मोकळा श्वास कधी घेणार ? असा प्रश्न सुजाण नागरिक करीत आहेत.

तालुक्यातील पोलीस ठाण्यात कामानिमित उच्चपदस्थ येत असलेले अधिकारी आपली वाहने मुख्य रस्त्यावर उभा करूनच पोलीस ठाण्यात प्रवेश करताहेत. त्यामुळे वाळूने पोलीस ठाणी घेरल्याचे चित्र दिसत आहे.    

जिल्हापेक्षा तालुका मोठा..
या कारवाईतील वाहनाची संख्या लक्षात घेता वडूज तालुका पोलीसठाण्यापेक्षा मायणीत वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्हापेक्षा तालुका मोठा असेच म्हणावे लागेल.
  
वाहने           वडूज      मायणी     
जेसीबी -        ३       -          
डंपर   -          ८       ४          
उपसा इंजिन-  १       -          
ट्रक्टर -          ८      ६           
टेंपो -             १      १           
पिक-अप -      १     २०   
-----------------------------      
एकूण :          २०     ३१ 
---------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT