kitty party start again after corona in sangli hoteling business also start 
पश्चिम महाराष्ट्र

आठ महिन्यानंतर पुन्हा रंगू लागल्या किटी पार्ट्या

सकाळ वृत्तसेवा

सांगली : हॉटेलिंग क्षेत्रासाठी एक चांगली बातमी आहे. महिलांच्या किटी पार्ट्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. महिला एकत्र येत आहेत, हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. कोरोना काळात हे सारे थांबले होते. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतरही अशा पार्ट्यांवर बंधन होतेच, मात्र आता हळूहळू या पार्ट्यांना रंगत येऊ लागली आहे. 

येथील एका हॉटेलमध्ये रविवारी पार्टी रंगली होती. हास्यकल्लोळात हॉटेल बुडाले होते. हॉटेल मालकाशी 'सकाळ'ने संवाद साधला. ते म्हणाले, 'आता जरा हायसे वाटले आहे. कारण, महिला वर्ग घरातून बाहेर पडला तरच हॉटेलिंग व्यवसायाला चांगले दिवस येतात. किटी पार्ट्यांची संख्या आपल्याकडे फार नसते, मात्र आठवड्यातून दोन-चार गट येतात. धम्माल करतात. फनी गेम खेळतात. जेवतात, आईस्क्रीम खातात. पार्सल घेतात. उलाढाल वाढते. 

शहरात किटी पार्टी कल्चर फार मोठ्या प्रमाणात नसले तरी उच्च मध्यमवर्ग त्याकडे कलला आहे. काही महिला भिशीच्या माध्यमातून एकत्र येतात. त्यावर निर्णय घेतात. महिन्यातून एखादी बैठक कम किटी पार्टी ही हॉटेलमध्ये होते. आपल्याकडील पार्टीमध्ये सभ्यता दिसते. इथे फनी गेम्सची धम्माल असते. इथेच छोट्या सहलींचे नियोजन केले जाते. सुख-दुःखाच्या गोष्टीही मोकळेपणाने बोलल्या जात. नव्या मैत्रिणी होतात. कोरोना संकटात हे सारे थांबले होते. मार्चपासून सारेच बंद होते. अजूनही हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवायला यायला महिला घाबरत होत्या. ती भीती आता हळूहळू कमी होत आहे.

 
संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT