सांगली - महावितरणच्या खणभागातील कार्यालयाजवळ मंगळवारी कर्मचारी संघटनेने हल्ल्याच्या निषेधार्थ केलेली निदर्शने.
सांगली - महावितरणच्या खणभागातील कार्यालयाजवळ मंगळवारी कर्मचारी संघटनेने हल्ल्याच्या निषेधार्थ केलेली निदर्शने. 
पश्चिम महाराष्ट्र

महावितरणच्या कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

सकाळवृत्तसेवा

सांगली - खंडित वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यास दमबाजी करत एकाने चाकू हल्ला केला. श्रेयस प्रवीणकुमार शहा (वय २२, रा. सांगलीवाडी) त्यात गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. खणभागातील कार्यालयात काल रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित हल्लेखोर साहिल मुल्ला आणि तिघे अनोळखी यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहा २०१७ मध्ये अनुकंपा तत्त्वाखाली महावितरणमध्ये भरती झाला. सध्या तो खणभागातील कार्यालयात विद्युत सहायक आहे. सोमवारी (ता. २७) नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता तो कार्यालयात आला.

कार्यालयीन कामकाज संपवून पाच वाजता घरी निघाले होते. त्यावेळी अन्य कर्मचारी  गैरहजर असल्याने पुढील शिफ्टचे कामही करावे, असे लाइनमन प्रफुल्ल श्रीरामे यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी काम सुरू केले. 

दरम्यान, मकान गल्लीतील नाईकवाडामधून अल्लाबक्ष अमीन मुल्ला यांनी घरातील वीज पुरवठा खंडित  झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार शहा यांनी मदतनीस प्रसाद व्हसवाडे यांना घेऊन मुल्ला यांच्या घरी गेले. तेथील मीटरची तपासणी केली. त्यावेळी पथदिवे सुरू असल्याने दुरुस्ती होणार नाही, असे सांगून ते निघून आले. अन्य एका तक्रारीचे निवारण करून शहा रात्री नऊच्या सुमारास पुन्हा कार्यालयात परतले. त्यावेळी साहिल मुल्ला व त्याचे आठ साथीदार शहा यांचा शोध घेत होते. शहा तेथे गेले. त्यावेळी साहिलने शहा यांना दमबाजी करण्यास सुरवात केली. घरातील वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी मारहाण केली. त्यानंतर साहिलने खिशातील चाकू काढून थेट हल्ला चढवला. अन्य तिघांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. त्यात शहा यांच्या कपाळावर, नाकावर गंभीर इजा झाली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीने ही मारामारी सोडवण्यात आली. रक्तबंबाळ शहा यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. 

घटनेचा निषेध
घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी  खणभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.  हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वीज क्षेत्रातील संघटनांची संयुक्त कृती समितीने केली. याबाबतचे निवेदनही पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT