पश्चिम महाराष्ट्र

उद्योजक खून प्रकरणी इचलकरंजीतील पाच जणांना आजन्म कारावास 

राजेंद्र होळकर

इचलकरंजी - येथील प्रसिद्ध यंत्रमाग उद्योजक मनोजकुमार पन्नालाल गट्टाणी (रा. तांबे माळ) यांच्या खून प्रकरणातील पाचही संशयितांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. अस्मर यांनी आजन्म कारावास आणि प्रत्येकी 25 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खून प्रकरणाने वस्त्रनगरी हादरली होती.

कापड व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून खुनाचा तपास तातडीने करण्याची मागणी केली होती. उद्योजक गट्टाणी यांनी 50 हजार खंडणी न दिल्याने त्यांचा खून झाला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी तपास केला होता. तर दोषारोपपत्र तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी न्यायालयात दाखल केले होते. सचिन महादेव शिरूटे उर्फ मड्डे, संजय बाळू नगारे, जोतिराम ऊर्फ जोतिबा अरविंद कलागते, लाला ऊर्फ लाल्या शफुद्दीन मलीक, राजू भिमाप्पा माळी (सर्व जुना चंदूर रोड परिसर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. 

आरोपीच्या वतीने चार वकिलानी बाजू मांडली. सरकारी वकील म्हणून विद्याधर सरदेसाई व एस.बी. सावेकर यांनी काम पाहिले. खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकांसह समर्थकांनी गर्दी केली होती. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. 

खून घटल्याची पार्श्‍वभूमी अशी -

मनोजकुमार गट्टाणी यांचा जुना चंदूर रोडवरील तनंगे मळ्यामध्ये ऍटोलुमचा कारखाना आहे. 30 जानेवारी, 2014 ला रात्री सव्वा आठच्या सुमारास ते मोटारसायकलवरून घरी येत होते. या वेळी सचिन शिरूटे, संजय नगारे, जोतिबा कलागते, लाल्या मलीक, राजू माळी यांनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांचा निर्घृणपणे खून केला. सत्यनारायण पन्नालाल गट्टाणी यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली होती. सर्व आरोपी कोल्हापुरातील कारागृहात होते. 

न्यायाधिश आर. जी. अस्मर यांच्या न्यायालयामध्ये 30 ऑगस्ट, 2016 ला खटल्याची सुनावणी सुरू झाली. एकूण 52 पैकी 26 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यामध्ये फिर्यादी सत्यनारायण गट्टाणी, पंच लक्ष्मण शिंदे, मुरलीमनोहर गट्टाणी, सुरेंद्रकुमार गट्टाणी, अनिल लाहोटो, सुरेद्रकुमार छाजेड, अविनाश शिंदे, प्रथम खबर देणारा अविनाश मारे, प्रत्यक्षदर्शी मयूर शिंदे, सचिन पाटील व शोभा यताळे, अशोक बांगर, निरतमल मंत्री, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार, संजय साळूंखे, आयजीएमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन, कॉन्स्टेबल उत्तम सावरतकर, कॉन्स्टेबल एन. डी. माळी, दिनकर मांगले, विष्णू शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना बोधडे, फोटोग्राफर प्रभाकर काजवे, कोयते तयार करणारा सुनिल लोहार, कोयते विकणारा विजय पाटील, भिमगोंडा पाटील आदीच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी केलेला यूक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. दंडाची रक्कम मृत गट्टाणी यांच्या कुटूंबीयांना देण्याबाबत न्यायालयाने निकालामध्ये म्हटले आहे. 

फाशीच्या शिक्षेची मागणी 
न्यायालयाने संशयितांना दोषी ठरवल्यानंतर सरकारी वकिलांनी गट्टाणी यांचा खून 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी अत्यंत शांत डोक्‍याने केला आहे. त्यामुळे संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. आरोपीच्या वकिलांनी त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी पाहून कमीत कमी शिक्षेची मागणी केली. याचा विचार करून न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT