पश्चिम महाराष्ट्र

‘स्पॉट व्हिजिट’वर वेशांतर करून गेलो - शशिराज पाटोळे

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याला घेऊन ‘स्पॉट  व्हिजिट’ करायची होती. स्पॉटवर हजारात ‘पब्लिक’ होते. तपासाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही ‘व्हिजिट’ महत्त्वाची होती. आम्ही सायंकाळी सूर्यास्ताची वेळ निवडली. शिंदेला विजार-शर्ट घातला. दाढी लावली. गावकरीच असल्यासारखा त्याचा वेश केला. आम्हीही पायात स्लिपर घातले. ढगळे शर्ट घातले. आम्हालाही कोणी ओळखू नये म्हणून दाढीही लावली. आमच्या बरोबरच्या पोलिसांचेही वेशांतर केले. त्यानंतर ‘व्हिजिट’ झाली. एका स्थानिक पत्रकाराने आम्हाला ओळखले होते; पण त्याने मौन बाळगल्यामुळेच हे शक्‍य झाले.

कोपर्डीतील लहान मुलगीवर बलात्कार करून खून झालेल्या गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे ‘सकाळ’शी बोलत होते. तपास करून ज्यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले ते या सर्व घटनेत प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सध्या ते कोल्हापुरात जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहतात.

कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभर मोर्चे निघाले आणि आजच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून राहिले होते. निकालानंतर सर्वच स्तरांतून न्यायालय, पोलिस आणि वकिलांचे अभिनंदन झाले. त्यांनी मोठ्या कौशल्याने ही घटना हाताळली. या सर्व घटनांतील अनेक घटना आजही पडद्याआड राहिल्या आहेत. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर आज ‘सकाळ’ने तपास अधिकारी शशिराज पाटोळे यांना बोलते केले.  त्यांच्याच शब्दात तपासातील नोंदी....

दहा मिनिटांत परत येणारी छकुली सायंकाळी घरी आली नाही म्हणून आई वाट पाहत दरवाजात उभी होती. तिने चुलत भावाला ती कोठे आहे हे पाहण्यास सांगितले. तो शोधत असताना गावाबाहेर छकुलीची सायकल दिसल्यावर तो थांबला. पाठोपाठ छकुलीची आई येत होती. चुलत भावाने नराधमाला पाहिले तेव्हा तो छकुलीच्या अंगावरून उठून पळून गेला. छकुलीचीही अवस्था आईने उघड्या डोळ्याने पाहिल्याने तिने हंबरडा फोडला आणि या घटनेचे गांभीर्य वाढले. पुढे मुख्य आरोपी पप्पूला आम्ही अटक केली; पण या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आरोपीला पोलिस कोठडी मिळाली तेव्हा पप्पूला स्पॉटवर नेणे गरजेचे होते; पण स्पॉटवर हजारो ‘पब्लिक’ होते. पप्पूला तेथेच मारले असते. तपास तर करायचा होता, अडथळे न्यायालयासमोर सांगू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही वेशांतर करून ‘स्पॉट व्हिजिट’ करण्याचा निर्णय घेतला. 
कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला घेऊन ‘स्पॉट  व्हिजिट’ करायची होती. ‘स्पॉट व्हिजिट’ झाल्यानंतर त्याने मला फोन करून तुम्ही आरोपीला  फिरविले काय असा प्रश्‍न केला; मात्र त्याने मौन बाळगले. बातमी वरवर घेऊन आमचे चेहरे दाखविले नाहीत.’’

तपासाच्या गोपनीयतेबाबत निरीक्षक पाटोळे म्हणाले, ‘‘पप्पूला न्यायालयात नेताना पब्लिकने त्याच्यावर हल्ला चढविला होता. त्याला वाचवताना माझा शर्ट-कपडे फाटले होते. त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आमची धडपड असायची. अनेक वेळा आम्ही मोकळे ‘कॅन्व्हॉय’ फिरवले. खासगी गाडीतून पप्पूला ठिकठिकाणी नेले. वैद्यकीय तपासणीला नेताना ‘पब्लिक स्टडी’ केला. पहाटे, रात्री, सकाळी, दुपारी जेथे पब्लिक कमी आहे तेथे तपास केला आणि ८७ व्या दिवशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आणि तपास पूर्ण झाल्याचा आनंद झाला.’’

१० आरोपींना फाशी
निरीक्षक पाटोळे यांनी केलेल्या गुन्ह्याच्या तपासातील १० आरोपींना फाशीची शिक्षा झाली. आरोपपत्र तयार करणे, त्यातील बारकावे आणि खुनाचा तपास यातील त्यांचा अनुभव या निकालातही उपयोगाला आला.

आरोपीला एसटीतून नेले...
आरोपी पप्पूला मारायचे या जिद्दीने पब्लिक पेटून उठले होते. त्याची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची होती. एक दिवस आम्ही पोलिसांच्या गाड्या गावात रिकाम्याच पाठविल्या आणि कर्जत ते नगर पप्पूला आम्ही एस. टी. बसमधून नेले. अनेकांनी पोलिसांच्या गाडीकडे धाव घेतली. दरम्यानच्या काळात आम्ही एसटीतून आणि पुढे खासगी वाहनातून सुखरूप पोलिस ठाण्यात पोचलो. पोलिस कोठडीचे १४ दिवस आणि नंतर ८७ दिवशी दोषारोपपत्र दाखल करेपर्यंतचे दिवस अविस्मरणीय ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT