पश्चिम महाराष्ट्र

निसर्गमित्र संस्थेची कचऱ्यातून धननिर्मिती

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर -  निसर्गमित्र संस्थेतर्फे ‘घनकचरा नव्हे, ‘धन’कचरा व्यवस्थापन’ या घरगुती कचरा व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन झाले. निसर्गमित्रच्या मार्गदर्शनानुसार अडीच-तीन वर्षांपासून घरगुती आणि बागेतील सेंद्रिय कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन करून खतनिर्मिती करणाऱ्या प्रमिला डोईफोडे, शैलजा आवटे, विना केमकर, प्रीतम काशीद यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.

अरविंद केमकर अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह अनिल चौगुले म्हणाले, ‘‘विज्ञानमास फेब्रुवारी २०१८ निमित्त महिनाभर संस्थेच्या कार्यालयात ‘कचऱ्यातून धननिर्मिती’ हे कृतिशील प्रदर्शन आणि घरगुती कचरा व्यवस्थापन कार्यशाळा सुरू आहे. यात २५ प्रयोगांची मांडणी केली. 

पर्यावरणप्रेमींच्या आग्रहामुळे या प्रयोगांची पुस्तिका तयार केली. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे कचरा व्यवस्थापनविषयक आज्ञापत्र, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन, ‘निसर्गाचं देणं पेटी’, शिजवलेल्या शिळ्या-खरकट्या अन्नापासून बायोगॅस तयार करणारे अतिशय कमी जागेतील संयंत्र, जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या कापडी पिशव्या, निर्माल्य व टाकाऊ पाना-फुलांपासून रंगनिर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. 

कचऱ्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांतून निसर्गाचा समतोल राखण्याबरोबरच आर्थिक फायदाही मिळू शकतो.’ पराग केमकर यांनी कचऱ्याचे वर्गीकरण, त्याच्या स्क्रॅप मूल्याविषयी मार्गदर्शन केले. जुनी साडी, जीन्स पॅंट, ओढणी, ब्लाऊजपीसच्या बदल्यात पुस्तिका खरेदी करा, असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे. यापासून प्लास्टिक कॅरीबॅगला पर्यायी कापडी पिशव्या तयार करण्यात येतील.

पुस्तकनिर्मितीसाठी प्रा. विकास काशीद, प्रा. उमाकांत आवटे, सलीम बैरागदार यांचे सहकार्य लाभले. अभय कोटणीस, पराग केमकर, भारत चौगुले, यश चौगुले, अनिल चौगुले यांनी संयोजन केले. आदर्श सहेली मंचच्या राणिता चौगुले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT