पश्चिम महाराष्ट्र

यंत्रमागधारकांना कर्जावरील व्याजात 5 टक्के अनुदान

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना देण्यासाठी साध्या यंत्रमागधारकांनी नागरी सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याज दरात 5 टक्के सवलत देण्याच्या निर्णयास आज राज्याच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. तर वीज दरात प्रती युनिट 1 रूपये सवलत देण्याचा निर्णय सुध्दा लवकरच मंत्री मंडळासमोर मान्य होईल, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. 

या निर्णयामुळे अडचणीत असलेल्या साध्या यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला असून मंदीच्या तडाक्यातुन बाहेर काढण्यासाठी यंत्रमागधारकांना शासनाने मदतीचा हात दिला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली आहे. 

इचलकरंजीसह राज्यात यंत्रमाग उद्योगात मंदीचे वातावरण असल्यामुळे त्यांना विविध सोई-सवलती देण्याची मागणी आमदार हाळवणकर यांनी पावसाळी अधिवेशन 2016 मध्ये केली होती. तसेच इचलकरंजी येथे ऑगस्ट 2016 मध्ये झालेल्या वस्त्रोद्योग परिषदेत राज्यातील यंत्रमागधारकांची मंदी, दुष्काळामुळे झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता विविध सोयी सवलती देण्याची घोषणा वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. 

या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार साध्या यंत्रमागधारकांनी दिनांक 21 नोव्हेंबर 2017 पुर्वी राष्ट्रीयकृत व सहकारी बँका, पतसंस्था वा इतर वित्तीय संस्था यांच्याकडून (खाजगी सावकाराव्यतिरीक्त) घेतलेल्या कर्जाचे 5 टक्के व्याज सरकार भरणार आहे. यंत्रमागधारकाचे कर्ज फीटेपर्यंत अथवा पुढील 5 वर्षे सरकारमार्फत व्याज भरण्यात येईल. राज्यात 90 हजार यंत्रमाग कारखाने असून 12.50 लक्ष साधे यंत्रमाग आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील 90 हजार यंत्रमागधारकांना होणार आहे. 
त्याचबरोबर यंत्रमागधारकांना दिनांक 01 जुलै 2016 पासुन वीजदरात प्रती युनिट रूपये 1 इतकी सवलत देण्याचे आश्वासन सुध्दा वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिले होते. हा प्रस्ताव सुध्दा लवकरच मंत्री मंडळासमोर येवून मान्यता मिळणार आहे. त्यासाठी सातत्याने अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती ही आमदार हाळवणकर यांनी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT