पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर दक्षिण, कागलमधील उमेदवारांसाठी सर्वेक्षण

निखिल पंडितराव

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी बाकी असला तरी कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा करून सर्वेक्षण सुरू केले आहे. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील, कागलमधून आमदार हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये हे सर्वेक्षण सुरू आहे. कार्यकर्त्यांनी या माध्यमातून आपल्या नेत्यांचा प्रचारच सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण आणि कागल या दोन्ही ठिकाणी हाय व्‍होल्टेज लढती होण्याचे संकेत आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यामध्येच लढत होणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्याकडून रिंगणात कोणाला उतरवणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

युवा नेते म्हणून ऋतुराज पाटील यांना सध्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे; परंतु त्यांचा मतदारसंघ कोणता हे गुलदस्त्यातच आहे; परंतु कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार ऋतुराज पाटील यांनाच गृहीत धरून तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनी ऑनलाईन सर्वेक्षण करून अंदाज घेण्यास सुरुवात केली. यामध्ये विद्यमान आमदार अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांच्यापैकी कोणाला अधिक पसंती, असा एकच प्रश्‍न विचारून उत्तर देण्यास सांगण्यात येते. त्यानंतर याचा येणारा निकालही लगेच आपल्या मोबाईलवर जाहीर करण्यास कार्यकर्ते सरसावले आहेत. 

कागल मतदारसंघातही आमदार हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे अशी थेट लढत होण्याची शक्‍यता आहे. आमदार मुश्रीफ यांनी मध्यंतरी लोकसभा निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केले होते. विधानसभा लढवणार का लोकसभा, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. कागलमध्ये त्यांनी सध्या त्यांचा मुलगा नविद यांना सगळ्या कार्यक्रमातून पुढे आणले आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांच्याविरुद्ध नेमके कोण, हे स्पष्ट नसले तरी सध्या तरी आमदार हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे असाच सर्व्हे मोबाईलवरून घेतला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT