पश्चिम महाराष्ट्र

ऑपरेटिंग परवान्यामुळे २४ ला ‘टेक ऑफ’ नक्की

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘२ बी डे’ ऑपरेटिंग परवाना आज मिळाला. या परवान्यामुळे २४ डिसेंबरला विमानाचे ‘टेक ऑफ’ निश्‍चित झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.

दरम्यान, सध्या आठवड्यातून तीन दिवस सुरू असलेली विमानसेवा आठवड्यातून सहा दिवस सुरू राहण्यासाठी केंद्र, राज्य आणि नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सहा वर्षांपासून खंडित झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशभरात सुरू झालेल्या उडान योजनेंतर्गत ही विमानसेवा सुरू होत आहे. या विमानसेवेसाठी डे ऑपरेटिंगच्या परवान्याची आवश्‍यकता होती. हा महत्त्वपूर्ण असलेला ‘२B डे ऑपरेटिंग परवाना’ प्रलंबित होता. तो आज ‘डीजीसीए’ने दिला. हा परवाना विमानतळ प्राधिकरणाकडे दिला आहे. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने याबाबत आज स्पष्टता केली.

खासदार श्री. महाडिक यांनी म्हटले आहे, की नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे बी. एस. भुल्लर यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच, परवान्याची प्रत एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे पाठवली आहे. त्यामुळे डे ऑपरेशन्स निर्धारित वेळेत सुरू होईल, हे निश्‍चित आहे. डे ऑपरेटिंग परवान्यासाठी कोल्हापूर विमानतळाच्या अधिकारी पूजा मूल यांच्यासह अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी म्हटले आहे, की परवाना मिळविण्यासाठी केंद्र व राज्यपातळीवर विविध प्रयत्न केले. परवाना नसल्याने उड्डाण होऊ शकत नव्हते. आज हा परवाना मिळाल्याने आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार, यावर शिक्कामोर्तब होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT