कोल्हापूर

Lockdown 1st Day, 1st Show; कुत्रे फिरवणे पडले महागात

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : सकाळी कुत्रे फिरवणे चौघा मालकांना चांगलेच महागात पडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (june rajwada police station) आणले. त्याचबरोबर मॉर्निंग वॉकर्सवरही अशाच पद्धतीने कारवाई (fine) करण्यात आली. येथे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून खटले दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

कोरोना संसर्ग (covid-19) साखळी तोडण्यासाठी संचारबंदीसह लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरू नका अशी वारंवार सूचना पोलिसांकडून वारंवार केली जाते. तरीही ही संख्या कमी झालेली नाही. त्याच्यावर कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. जिल्ह्यात रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याची काटेकोर अमंलबाजवणीसाठी जिल्हा पोलिस दल बंदोबस्त बजावत आहेत.

आज सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया जुना राजवाडा पोलिसांनी सुरू केली. रंकाळा, तपोवन, सानेगुरुजी वसाहत परिसर, रिंगरोड, हॉकी स्टेडियम अशा परिसरात पोलिसांनी वॉच ठेवला होता. कुत्रे फिरविण्यासाठी रस्त्यावर आलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणले. त्याचबरोबर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ३३ जणांना ताब्यात घेतले. यात बहुतांशी साहेब दूध आणायला आलो होतो हेच कारणे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र घरापासून इतके दूर कसे आला कोठे आहे येथे डेअरी अशा पोलिसांच्या प्रतिसवालाला पुढे त्यांना उत्तर देता येत नव्हते. त्या सर्वांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. संचारबंदीपासून ही कारवाई सुरू असून ती अधिक तीव्र करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT