42 Employees Absent During Office Hours In Ichalkaranji Kolhapur Marathi News
42 Employees Absent During Office Hours In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत कार्यालयीन वेळेत 42 कर्मचारी अनुपस्थित

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी केली होती. त्याकडे बहुतांशी कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. उपमुख्याधिकारी केतर गुजर व कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी गुरुवारी सकाळी तपासणी केली. यामध्ये तब्बल 42 कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. तर 35 कर्मचाऱ्यांनी हजेरी बुकावर स्वाक्षरी केली नसल्याचे निदर्शनास आले. 

या सर्वांना मुख्याधिकारी खांडेकर यांनी शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस लागू केली असून 24 तासांच्या आत खुलासा करण्याची सूचना दिली आहे. या मुख्याधिकारी खांडेकर यांच्या धडक कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
पालिकेत विविध कामाच्या निमित्ताने नागरिक येत असतात. याशिवाय विविध मागण्यांसाठी नागरिकांचा मोर्चा येत असतो. अशावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्‍यक असते; पण अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याच्या तक्रारी होत्या. 

अनेक कर्मचारी कार्यालयीन कामासाठी बाहेर फिरती असल्याचे सांगून आपली वैयक्तिक कामे करीत असतात. त्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांचे हेलपाटे होत असतात. बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्‍यक असताना त्याकडे कर्मचारी दुर्लक्ष करतात. 

कार्यालयीन शिस्त बिघडल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही बाब मुख्याधिकारी खांडेकर यांनी गांभीर्याने घेतली. त्यांनी यापूर्वी लेखी सक्त सूचना दिली होती. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा पाळण्यासह हालचाल रजिस्टरला नोंदी करण्याबाबत बजावले होते. यामध्ये कोणत्याही प्रकारची निष्काळजी न करण्याची सक्त सूचना दिली होती. 

कर्मचाऱ्यांची उडाली भंबेरी 
उपमुख्याधिकारी गुजर व कामगार अधिकारी राजापुरे यांनी प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. अनेक कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी न थांबता अन्य ठिकाणी विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. तपासणी सुरू असल्याचे समजताच कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. 

...तर कारवाई 
कार्यालयीन वेळेत हजर न राहिल्याबद्दल 42, तर हजेरी बुकावर स्वाक्षरी न करणाऱ्या 35 जणांना मुख्याधिकारी खांडेकर यांनी शिस्तभंगाच्या कारवाईची कारणे दाखवा नोटीस लागू केली आहे. या संदर्भात 24 तासांत खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT