69 new vaccination centers in Kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणासाठी 69 नवी केंद्रे 

शिवाजी यादव

कोल्हापूर :  45 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेता येणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना भीती वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वांना लस उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यात आणखी 69 लसीकरण केंद्रे स्थापन केली आहेत. तर 60 हजार लस येथे आल्या आहेत.

येणाऱ्या काळात लसीकरण अधिक वेगाने होऊन कोरोना आटोक्‍यात येण्यास मदत होणार आहे. दोन महिन्यापूर्वी कोविशिल्ड लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील कोरोना योद्‌ध्यांना लसीकरण केले. यात डॉक्‍टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता तर त्यानंतरच्या टप्प्यात सुरक्षा सेवेतील व्यक्तींना लसीकरण झाले. तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच कोमॉरबीड (व्याधी ग्रस्त) व्यक्तींना लसीकरण सुरू आहे. अनेकजण गैरसमजातून लस घेण्यासाठी चालढकल करीत होते. दीड महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे अनेकजण लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत आहेत. 

जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिलेली माहिती अशी
*जिल्ह्यात 150 लसीकरण केंद्र आहेत यात 69 केंद्रांचा समावेश आहे. 
*शासकीय व खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र 
*व्याधीग्रस्त व्यक्तींना व्याधीचा दाखल घेऊन कोविशिल्ड लसीकरण करून घेता येत होते ही अट शासनाकडून रद्द 
* आता 45 वर्षावरील कोणालाही लस घेता येणार आहे 
* कोविशिल्ड लस गरोदर महिला व स्तनदा मातांना घेता येणार नाही 
*ज्या व्यक्तींना ऍलर्जी आहे, ज्यांना रिऍक्‍शन येते त्यांनाही लस घेता येणार नाही 
*18 वर्षाखालील व्यक्तीना लस घेता येणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 317 अंकांनी वाढला; ऑटो-फार्मामध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा अतरंगी टिझर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही समोर

Sangli Children : चौदा महिन्यांचा श्रवण व अडीच वर्षांचा करण खेळताना पाण्याच्या टाकीत डोकावले अन्..., आई घरकामात व्यस्त घडलं भयानक

चाहत्याच्या वागण्यामुळे राजामौली संतापले!

Heatwave Survey : ‘हिवताप’ सर्वेक्षण सातारा जिल्ह्यात गतिमान; डेंगीचे ५९, मलेरियाचे ३९, तर चिकनगुनियाचे १७ रुग्‍ण आढळले

SCROLL FOR NEXT