The advice is taken from the consulting company, ignoring the ability of the municipal engineer 
कोल्हापूर

पालिका अभियंत्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष, सल्लागार कंपनीला दाम मोजून घेतला जातो प्रकल्पांचा सल्ला

डॅनिअल काळे

कोल्हापूर,   ः सल्लागार कंपन्यांवर महापालिकेने आजवर कोट्यवधी रुपये खर्च केले; पण महापालिकेत अभियंते म्हणून नोकरीस असणाऱ्यांना अतांत्रिक कामातच गुंतवून ठेवले आहे, तसे पाहिले तर सल्लागार कंपन्यांकडे काम करणारे अभियंत्यांपेक्षा महापालिकेच्या अभियंत्यांकडे असणारा अनुभव दांडगा आहे. तरीदेखील त्यांना टेंडर, कारवाई, फिरती यासह अनेक अतांत्रिक कामात गुंतवणूक ठेवल्याने महापालिकेच्या या अभियंत्याची अवस्था "घर की मुर्गी डाल बराबर' अशी झाली आहे. त्यामुळे आजवर सल्लागार कंपन्यांवर महापालिकेने केलेला खर्चही वाया गेल्यासारखीच स्थिती आहे. सल्लागार म्हणून काम करणे आणि प्रत्यक्ष काम करणे, यामध्ये खूप मोठे अंतर असल्याचे महापालिकेच्या प्रकल्पाकडे पाहिल्यानंतर दिसून येते. 
कागदोपत्री प्रकल्प रंगविणे आणि ठेकेदाराच्या सोयीसारखे काम करण्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे कन्सल्टंट कंपन्या होय. महापालिकेचे आजवर जे जे मोठे प्रकल्प झाले, त्यापैकी एकही प्रकल्प कन्सल्टंट कंपनीच्या सल्ल्याप्रमाणे यशस्वी झाला, कमी खर्चात आणि वेळेत झाला, असे एकही उदाहरण महापालिकेत नाही. उलट न काही करता केवळ कागदोपत्री प्रकल्प उभा करून महापालिकेच्या तिजोरीतील लाखो रुपये लाटण्यातच या कंपन्या यशस्वी झाल्या आहेत. या सर्व प्रकारांत महापालिकेच्या कारभाराची अवस्था "आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय', अशीच झाली आहे. मोठ्या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कंपन्या अथवा त्यांचे संचालक कोणतरी बडे अधिकारी अथवा बड्या राजकारणाशी संबंधित असतात. विविध सरकारी खात्यातून निवृत्त झालेला एखादा अधिकारी नेमायचा, पंधरा हजार पगारावर आणखीन दोन ते तीन अभियंते नेमले की, झाले कन्सल्टंट कंपनी. मग एखादा प्रकल्प या टीमकडे सोपवून मुख्य कन्सल्टंटही रिकामाच होतो. त्यामुळे प्रकल्पाचीही वाट लागते आणि त्यावर खर्च झालेल्या पैशाची. 
त्यामुळे यापुढे कन्सल्टंट कंपन्यांवर होणारा लाखो, कोट्यवधी रुपयांचा खर्च बंद करावा आणि महापालिकेने स्वतःच्याच अभियंत्यांना अशी कामे दिली. प्रकल्पांची जबाबदारी दिली, तर चांगले प्रकल्प तयार होतील. अशा प्रकल्पांवर महापालिकेचे लक्षही राहील आणि लोकांना चांगल्या सुविधाही मिळतील. 

अभियंत्यांना अतांत्रिक कामे 
महापालिकेकडे 40 अभियंते आहेत. स्पर्धा परीक्षेसारख्या परीक्षा देऊन त्यांची नियुक्ती झालेली असते, मग प्रकल्प हाताळण्याची अथवा प्रकल्प अहवाल बनविण्याची क्षमताही त्यांच्या अंगी असते; पण क्षमतेला येथे वाव मिळत नाही. बांधकाम परवाने देणे, विविध प्रकल्पाचे टेंडर काढणे, फिरते दौरे आणि मीटिंगा करणे, तसेच बऱ्याचदा ज्या कामाशी अभियंते म्हणून त्यांचा संबंधही नाही, अशी कामे करणे यातच त्यांचा वेळ जातो. परिणामी अभियंते म्हणून त्यांची जी काही कुशलता असते. तिचा वापर येथे होतच नाही. त्यामुळे ज्या कारणासाठी ते अभियंते बनले, ते कारण महापलिकेत कामालाच येत नाही.  

संपादन-यशवंत केसरकर,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT