lalbaugcha Raja 2024 esakal
कोल्हापूर

कोल्हापुरात 14 फूट उंचीच्या 'लालबागचा राजा'चे दिमाखात आगमन; तावडे हॉटेल परिसरात गर्दीने धक्काबुक्की अन् चेंगराचेंगरी

lalbaugcha Raja 2024 : मुंबईतील मूर्तिकार रत्नाकर व संतोष कांबळी यांनी ही मूर्ती तयार केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

तावडे हॉटेल परिसरात झालेल्या गर्दीने चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद खावा लागला.

कोल्हापूर : रंकाळवेस गोल सर्कल मित्र मंडळाच्या (Rankalavesh Goal Circle Mitra Mandal) चौदा फूट उंचीच्या ‘लालबागचा राजा’ (lalbaugcha Raja 2024) गणेशमूर्तीचे मोठ्या आवाजाची ध्वनी यंत्रणा व ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. मूर्तीच्या स्वागतासाठी तावडे हॉटेलचा परिसर तरुणाईच्या गर्दीने फुलून गेला. रात्री उशिरापर्यंत येथे सळसळता उत्साह पाहायला मिळाला.

मुंबईतील मूर्तिकार रत्नाकर व संतोष कांबळी यांनी ही मूर्ती तयार केली आहे. सुवर्ण आभूषणांनी सजविलेल्या मूर्तीचे मुंबईहून कोल्हापुरात आगमन झाले. उद्योगमंत्री उदय सामंत मूर्तीच्या (Uday Samant) पूजनासाठी येणार असल्याने येथे चोख पोलिस बंदोबस्त होता.

सहा वाजल्यांनंतर परिसरात गर्दीचा महापूर आला. रात्री आठ वाजेपर्यंत मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणेसह विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला होता. हजारो तरुणाई संगीताच्या ठेक्यावर थिरकत होती. रात्री उशिरा तावडे हॉटेल येथून मार्केट यार्ड येथे गणेशमूर्ती नेण्यात आली.

धक्काबुक्की अन् चेंगराचेंगरी...

तावडे हॉटेल परिसरात झालेल्या गर्दीने चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद खावा लागला. माध्यम छायाचित्रकारांना खाकी वर्दीवाल्यांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला. याचवेळी काही कार्यकर्त्यांकडून चप्पल फेक झाली. त्यामुळे रस्त्यावर चपलांचा खच पडल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT