wari
wari sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : वारी चुकली, गाठणार पंढरी!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दादा आणि आईची गेल्या चव्वेचाळीस वर्षांत कधीच वारी चुकली नाही...दादांचं वय नव्वद, तर आईचं वयही पंच्याऐंशीच्या पुढे. त्यामुळे घरात लहानपणापासून विठ्ठलभक्तीचे संस्कार. दोन वर्षांत कोरोनामुळे त्यांची वारी चुकली. यंदा वारीला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा; पण वयामुळं यंदा आम्ही सर्वानुमते त्यांना वारीला न जाण्याची विनंती केली. ते वारीला गेलं नसले तरी आषाढी एकादशीला मात्र आम्ही त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहोत...प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील संभाजी पाटील, शिवाजी पाटील सांगत असतात.

प्रयाग चिखलीतील पाटील हे एक मोठ्ठं वारकरी कुटुंब. त्याशिवाय गावात वारीची परंपरा अनेक वर्षांची. दोन वर्षांनंतर गावातून पारंपरिक उत्साहात यंदा वारीचे प्रस्थान मात्र झाले आहे. पाटील कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेतीच. विठ्ठलनामाचा अखंड गजर करणाऱ्या शिवाजी यांनी पंधरा वर्षांपूर्वी विनोदी चित्रपटांची लाट असताना ‘राजा पंढरीचा’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट गाजलाही. ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’ हे गाणं हिट झालं. शब्दप्रभू जगदीश खेबूडकर यांनी चित्रपटासाठी गीते लिहिली होती. शिवाजी पाटील सांगतात, ‘‘गेली काही वर्षे आई-वडिलांबरोबर मीही वारीला जायचो. पण, यंदा त्यांच्या वयामुळे आम्ही थांबलो असलो तरी एकादशीला पंढरपूरला जाऊन त्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवून आणून व्दादशीला परत येणार आहे.’’

दळवींची वारी...

दत्तात्रय दळवी यांच्या स्मरणार्थ संपतराव दळवी यांनी चाळीस वर्षांपासूनची आषाढी पायी दिंडीची परंपरा मात्र यंदाही कायम ठेवली आहे. त्यांच्यासह परिसरातील शंभरहून अधिक वारकरी पायी दिंडीत सहभागी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT