Attal arrested for burglary
Attal arrested for burglary 
कोल्हापूर

अट्टल घरफोड्यांना केले सापळा लावून जेरबंद

पंडित कोंडेकर

इचलकरंजी ः शहापूर पोलिसांनी काल अटक केलेल्या कर्नाटकातील दोन तोतया पोलिसांकडून गावठी बनावटीच्या एका पिस्तूलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत काय, याचा सखोल तपास शहापूर पोलिस करीत आहेत. याबाबतची माहिती आज पोलिस निरीक्षक प्रकाश निकम यांनी पत्रकारांना दिली.

तारदाळ येथे एका घरात घुसून कर्नाटक पोलिस असल्याची बतावणी करीत घरझडती घेण्याचा प्रयत्न दोन तोतया पोलिसांनी केला होता. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर शहापूर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. मोहन सुरेश पवार (वय 20, रा. साखरवाडी, निपाणी) व प्रकाश मारुती कुंभार (नाईंग्लज, ता.चिकोडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायलयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील मोहन पवार याच्यावर तोतया पोलिस असल्याचा गुन्हा निपाणी पोलिसांत दाखल आहे.

दरम्यान, त्यांच्याकडून जप्त केलेल्या दुचाकीची तपासणी शहापूर पोलिसांनी केली. त्यामध्ये शीटखाली एक गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून हे कोठून उपलब्ध झाले याचा शोध घेत आहेत. तसेच या पिस्तूलचा वापर करून आणखी कोणते गुन्हे केले आहेत काय, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निकम यांनी दिली. 
निकम यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात उपनिरीक्षक जी.के. खराडे, हवालदार महेश कोरे, ज्ञानेश्‍वर बांगर, अमर पाटील, सुनील बाईत, अमर कदम, अमित भोरे यांचा समावेश आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT