कोल्हापूर : शाळा बहरल्या पहिल्याच दिवशी ९५ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी
कोल्हापूर : शाळा बहरल्या पहिल्याच दिवशी ९५ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : शाळा बहरल्या पहिल्याच दिवशी ९५ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोविडमुळे बंद असलेच्या चिमुकल्यांच्या शाळेला अखेर आज मुहूर्त मिळाला. पहिल्या दिवशी गुलाबपुष्प व हाताला सॅनिटायझर लावून होणारे स्वागत, वर्गात पहिले पाऊल टाकताच पालकांकाडे टाकला जाणारी नजर अशा वातावरणात आज शाळा सुरू झाल्या.

पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात जिल्ह्यात ९० ते ९५ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. जिल्ह्यात दोन हजार ४६३ शाळांत ९५ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थित लावली. शहराच्या हद्दीतील शाळांचाही यात समावेश आहे. शहरात पहिली ते सातवीपर्यंतच्या १८३ शाळा आहेत. ७६ शाळांत ६५ टक्के विद्यार्थी हजर राहिले. मनपा प्राथमिक शिक्षण समितीने एक सदस्यांची पंधरा पथके तैनात केली होती. सकाळी दहाच्या सुमारास पालक, विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू झाली.

शाळेची पायरी चढताना डोळ्यातून वाहणारे बालकांचे अश्रू आणि त्यांची समजूत काढणारे पालक, शिक्षक असे वातावरण सर्वत्र होते. ग्रामीण भागात पूर्वीच शाळा सुरू झाल्या आहेत. आजपासून पहिली ते चौथीचे वर्गही सुरू झाले. प्रभारी प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी जरगनगर शाळेला भेट दिली. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस बंधनकारक केले आहेत. प्रशासनाधिकारी यादव यांनी मुख्याध्यापकांशी व्हीसीद्वारे संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासंबंधी मार्गदर्शन केले

पाऊस आणि जूनची आठवण

एरव्ही नव्या शैक्षणिक वर्षास जूनमध्ये सुरूवात होते. त्यावेळी पावसाचा हलकासा का असेना पण शिडकावा होतो. आज एक डिसेंबरला शाळा सुरू झाल्या आणि योगायोग असा की शाळा सुटण्यावेळी नेमका पाऊस सुरू झाला. घरी परतताना विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

एकूण शाळा सुरू झालेल्या शाळा उपस्थित विद्यार्थी संख्या

  • ग्रामीण पहिली ते चौथी शाळा - १,५३० १,५२९ १ लाख ४७, ७५९

  • शहरी पहिली ते सातवी शाळा - ४३६ ४३५ ६५ हजार १०९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT