कोल्हापूर

बाबासाहेब पाटील भुयेकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे मार्गदर्शक आणि शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील -भुयेकर यांचं आज दुपारी निधन झालं ते 78 वर्षाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरच्या आजारानं त्रस्त होते. शेतीपंपाची वीजदरवाढ, सरकारी पाणीपट्टी वाढी विरोधातील आंदोलनात ते अग्रेसर होते. (babasaheb-patil-bhuyekar-vice-president-of-shetkari-sahakari-sangh-died-today-kolhapur-marathi-news)ज्येष्ठ नेते प्रा.डॉ. एन ,डी पाटील यांच्या बरोबरीनं शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्‍नांवरील आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.

वारणा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी देण्यास नदी काठच्या दोन्ही बाजूच्या गावांतील लोकांचा विरोध होता. या आंदोलनासाठी संघटन करायचं कामही त्यांनी केलं होतं. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. खासगी रूग्णालयातील उपचारानंतर ते घरीच होते. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी , दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT