bjp leader chandrakant patil BJP Congress defeated NCP Shiv Sainik alone in khanapur 
कोल्हापूर

जुन्या मित्राला धडा शिकवण्यासाठी चंद्रकांत पाटलांची खेळी; स्वतःच्या गावात ग्रामपंचायतसाठी भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी

सुनील पाटील

कोल्हापूर : राज्यात भाजप विरूध्द महाविकास आघाडीचा या-ना त्या कारणाने संषर्घ सुरु आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या  खानापूर या गावातील ग्रामपंचायत निवडणूक भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना अशी होत आहे.  कोल्हापूरात पालकमंत्री सतेज पाटील (कॉंग्रेस) आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) यांच्यावर टिका करण्याची किंवा त्यांच्या टिकेला उत्तर देण्याची एकही संधी चंद्रकांत पाटील सोडत नाहीत. पण चंद्रकांत पाटील यांच्याच गावात या तिन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते एकत्र येवून शिवसेनेविरूध्द ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे हा विषय जिल्ह्यात चर्चे झाला आहे. 

राज्यात 1 हजार 400 हून अधिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात 433 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत. यापैकी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या गावचीही निवडणूक होत आहे. यामध्ये, भाजप पक्षाच्या गावपातळवरील नेत्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत एकत्र ऐवून शिवसेनेला टक्कर देत आहेत. त्यामुळे या निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विधानसभा व लोकसभा निवडणूकीत एकमेकांवर जोरदार टिका करणारे हे तिन्ही पक्ष एकत्र आणण्याचे धाडस खानापूर ग्रामस्तांनी करुन दाखले आहे. 

खानापूर ग्रामपंचायतीवर सध्या भाजपची सत्ता आहे. निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकमेकांच्या गटातील कार्यकर्तेही बदलले आहेत. शिवसेनेला रामराम ठोकून सेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केलेले प्रवीण सावंत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा घेतला आहे. त्यामुळे गावात आता इर्षा आणि चुरस पाहयला मिळत आहे.  

 संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card: आधार कार्ड कुठे आणि कशासाठी वापरले ते कळणार; नवीन अॅपमुळे काम सोप होणार, प्रक्रिया काय?

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये चाललंय तरी काय? उस्मान हादीनंतर शेख हसीनांच्या आणखी एका कट्ट्रर विरोधकावर हल्ला; भर प्रचारसभेत झाडल्या गोळ्या

India-New Zealand FTA : भारत–न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार! 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक; कृषीसह या क्षेत्रांना होणार फायदा

Mumbai News: संसर्ग नियंत्रणासाठी प्रयोग! पालिका रुग्णालयांत ‘सूक्ष्मजंतूनाशक बेड मॅट’ वापरण्याबाबत चर्चा

Latest Marathi News Live Update : विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले, भाजप पक्ष एक नंबर ठरला - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT