bjp shiv sena protest kolhapur
bjp shiv sena protest kolhapur 
कोल्हापूर

शिवसेना- भाजप आमने -सामने ; एकाच वेळी दोन्ही पक्षांचे आंदोलन  

संदीप खांडेकर

कोल्हापूर : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने केंद्र सरकार तर कोरोनाच्या संचारबंदीच्या काळातील घरगुती वीज बिल माफ व्हावीत, याकरिता भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारवर आज हल्लाबोल केला. त्यानिमित्ताने दोन्ही पक्ष आज आमने-सामने आले. 

गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलचा दर प्रतिलिटर शंभर रुपयांवर पोचण्याच्या मार्गावर आहे. या दरवाढीविरोधात सर्वसामान्य नागरिकांत संताप आहे. केंद्रातील भाजप अर्थात मोदी सरकार या दरवाढीने टीकेचे लक्ष्य बनले आहे. शिवसेनेने या दरवाढीचा निषेध करत मोदी सरकारवर टीका केली. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षानेही राज्य सरकारवर ताशेरे ओढले. कोरोनाच्या संचारबंदीतील घरगुती वीज बिले माफ करावीत, अशी मागणी करत भाजपने राज्य सरकारवर तोफ डागली.

पंधरा दिवसांत थकीत वीज बिल भरले नाही तर वीज कनेक्शन तोडले जाईल, अशा राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना नोटिसा पाठविणाऱ्या महावितरणच्या कारभाराचा निषेध करत भारतीय जनता पक्षातर्फे महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयातील गेट नंबर दोनला आज टाळे ठोकण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व पोलिस यांच्यात झटापट झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
 

कोरोनाच्या काळातील घरगुती वीज बिले बहुतांशी ग्राहकांनी अद्याप भरलेले नाहीत. वीज बिले माफ व्हावीत, अशी त्यांची मागणी आहे. त्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने करत आज थेट महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. ठाकरे सरकार सर्वसामान्य जनतेला आणखी किती विजेचे धक्के देणार?, बिल्डरांना प्रीमियमसाठी व मद्य विक्रीसाठी ५०% सूट दिली असताना गोरगरिबांना वीज बिलात सवलत का दिली नाही?, कोरोनाच्या काळात मंत्र्यांना कार खरेदी करून देण्यास राज्य सरकारकडे बक्कळ पैसा. मात्र, जनतेला वीज बिलातून दिलासा देण्यास पैसे नव्हते का?, ताज हॉटेलचे दहा कोटी रुपये माफ करणाऱ्या  सरकारने वीज बिल का माफ केले नाही?, या आशयाचे फलक घेऊन कार्यकर्ते प्रवेशद्वारासमोर जमले. त्यांनी गेट नंबर दोनला साखळदंड बांधून टाळे ठोकले.

भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, मारुती भागोजी, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, डॉ.सदानंद राजवर्धन, रविंद्र मुतगी, भरत काळे, संतोष माळी, धीरज पाटील, संजय जासूद, आशिष कपडेकर, अभिजित शिंदे, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, साजन माने, युवा मोर्चा अध्यक्ष विजय खाडे-पाटील, संदीप कुंभार विवेक वोरा, वल्लभ देसाई, गौरव सातपुते, सुमित पारखे, विराज चिखलीकर, गिरीश साळोखे, हेमंत आराध्ये आंदोलनात सहभागी झाले.
 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT