Chain snatcher back in Kolhapur
Chain snatcher back in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात चेन स्नॅचर पुन्हा सुसाट

राजेश मोरे

कोल्हापूर : महिलांनो दागिने घालताय तर सावध रहा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. लग्नसराईत चेन स्नॅचर शहरात पुन्हा सक्रिय झाले आहेत. भरदिवसा एकाच दिवशी दोन ठिकाणी हात मारून त्यांनी झलकही दाखवून दिली आहे. 

सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिला घराबाहेर पडतात. बाजारहाट करण्यासाठीही जातात. तेव्हा दागिने घालूनच त्या जातात. त्यावेळी काही क्षणात हात मारला असता हजारो रुपयांचे दागिने लंपास होऊ शकतात. अवघ्या क्षणातील ही कमाई अनेकांना मोहीत करणारी आहे. यातूनच भरधाव वेगाचा आधार घेणारे काही चोरटे हात मारून जाता जाता दागिने हिसकावतात. चोरीचे दागिने विकत घेणारी यंत्रणाही स्वतंत्ररित्या त्यांनी हेरून ठेवली असते. 

दिवाळी, नाताळ सुटीदरम्यान शहर परिसरात पर्यटकांची संख्या वाढते. नाताळ पाठोपाठ 31 डिसेंबरचा आनंद लुटण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. अंबाबाई मंदिर, रंकाळा, जोतिबा मंदिर, पन्हाळा आदी ठिकाणी त्यांची गर्दी दिसू लागली आहे. याचकाळात लग्नसराईही सुरू झाली आहे. पर्यटकासाठी आलेल्या महिलांच्या आणि लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या महिलांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यावर डोळा ठेऊन मोटारसायकल चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. भरदिवसा दोन दिवसापूर्वी शहरातील गजबजलेल्या रमणमळा येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोघा मोटारसायकलस्वार चोरट्याने पळविले. काही अंतराने राजेद्रनगर परिसरात एका मोपेडस्वार चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. दोन्ही प्रकारात चोरट्याच्या पाच तोळ्यांचे दागिने लुटून नेले. 
प्राथमिक तपासात हे चोरटे 20 ते 25 वयोगटांतील असल्याची माहिती पुढे आली. या कृत्यामागे स्थानिक लुटारूसह इराणी टोळीचा हात असल्याचा संशय बळावला आहे. जोपर्यंत हे लुटारू हाती लागत नाही तोपर्यंत आम्ही दागिने घालायचे की लॉकर्समध्येच ठेवायचे असा सवाल महिलावर्गांतून विचारणा केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT