Chambukhadi water relies on tank safety
Chambukhadi water relies on tank safety 
कोल्हापूर

चंबुखडी पाणी टाकीची सुरक्षा रामभरोसे 

राजेंद्र पाटील

शिंगणापूर : कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणारी चंबूखडी येथील पाण्याच्या टाकीची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी तरुण या टाकीवर फुटबॉलचा खेळ खेळत असतात. 72 वर्षापूर्वी बांधकाम पुर्ण झालेल्या या टाकीची सुरक्षा राखण्याकडे महानगरपालिका प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 

शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी फुलेवाडी उपनगराच्या पुढे शिंगणापूर रोडवर चंबुखडी येथे उंच टेकडीवर सुमारे 95 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. 19 ऑक्‍टोंबर 1942 ला प्रिन्सेस पद्माराजे छत्रपती यांच्या हस्ते टाकीच्या बांधकामास सुरुवात झाली. 14 एप्रिल 1948 ला टाकीचे बांधकाम पूर्ण झाले व पाणीपुरवठा सुरू झाला. त्यावेळी दोन लाख 35 हजार 625 रुपये बांधकामास खर्च आला. 

पद्माराजे जलाशय चंबुखडी असे टाकीस नाव देण्यात आले. या टाकीतून कोल्हापूर शहरातील निम्म्याहून अधिक भागाला पाणीपुरवठा होत आहे. 95 लाख लिटर क्षमता असलेल्या या चंबुखडी पाण्याच्या टाकीत 24 तास पाणी येत राहते व बाहेर सोडले जाते. सध्या सकाळी व सायंकाळी तरुण मुले या टाकीवर फुटबॉल खेळ खेळत असतात. टाकीला वरती अनेक खुली झाकणे आहेत. टाकीच्या परिसरात चारी बाजूला रात्री जेवणावळी उठत असतात. सर्वत्र दगडांच्या चुली दिसून येतात. जेवणावळी करणारे केरकचरा, दारूच्या बाटल्या तेथेच टाकून जातात. टाकी परिसरात दिवसा एक कर्मचारी व रात्री दोन कर्मचारी कामावर असतात. या कर्मचाऱ्यांना फुटबॉल खेळणारी व जेवणावळी करणारे तरुण दाद देत नाहीत. या तरुणांना हटविण्यास पालिका कर्मचाऱ्यांना मर्यादा पडतात. त्यामुळे पाणी टाकी परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त सुरू होणे आवश्‍यक बनले आहे. 
(पुर्वाध) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क; नवीन आदेश 'या' तारखेपासून लागू

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT