chandrkant Patil
chandrkant Patil sakal
कोल्हापूर

भाजपसाठी मोठी संधी: जयसिंगपूर पालिका कमळ चिन्हावर लढणार

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक (Jaisingpur Municipal Election) भाजप कमळ चिन्हावर लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. येथील मर्चंट असोसिएशनमध्ये झालेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मंडल अध्यक्ष रमेश यळगूडकर (Ramesh Yalgudkar)यांनी स्वागत केले. शहराच्या विकासासाठी नगरपालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला असून त्याआधी पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांची मते विश्वासात घेतली आहेत. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसाठी संधी असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. (Chandrakant Patil visit in Jaisingpur)

दौऱ्याच्या सुरुवातीस त्यांनी क्रांती चौकातील छत्रपती शाहू महाराज व छत्रपती जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. उद्योगपती विनोद घोडावत, जयसिंगपूर भाजपचे सरचिटणीस राजेंद्र दाईंगडे, मराठा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत नलवडे, उद्योगपती विनोद चोरडिया यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. वडार समाजाचे सखाराम नलवडे, अशोक भोसले, रमेश कलकुटगी यांच्याशी वडार समाजाच्या अनेक समस्यांवर चर्चा केली.

नगरपालिका निवडणूक प्रभारी व माजी मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे यांनी आभार मानले. या वेळी ज्येष्ठ नेते मोहनराव कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, जि. प. सदस्य अशोक माने, नगरसेविका सोनाली मगदूम, सरचिटणीस सुनील शर्मा, युवा मोर्चा चिटणीस संतोष जाधव, पंकज गुरव, सुनील ताडे, विनायक अणेगिरीकर, वसंत पवार, हरीश सूर्यवंशी, आदम मुजावर, भीमराव हडपद, महिला मोर्चा अध्यक्ष रागिणी शर्मा, ऋतुजा यळगुडकर, सायली कुलकर्णी, संघाचे महेंद्रसिंग रजपूत, प्रमोद वाड, दीपक अणेगिरीकर, व्यापारी राजकुमार बलदवा, हिरालाल पटेल, पिंटू लोनिया, अनिल बरडीया, प्रसन्ना कुंभोजकर, अण्णासो पवार, जैनुभाई अत्तार, शैलेश गाडे, सुरज रजपूत, कुलदीप देशपांडे, सचिन ताडे, बबलू शिंदे उपस्थित होते.

कुरुंदवाडला भेट

कुरुंदवाड : महाविकास आघाडी सरकारने केवळ अध्यादेश काढून ओबीसींना न्यायालयात न टिकणारे राजकीय आरक्षण देत ओबीसींची फसवणूक केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. भाजप नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, भाजप तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष राजेंद्र फल्ले उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHT CET 2024 Results Declared: एमएचटी सीईटी निकाल जाहीर, 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल! असा पाहा निकाल

Latest Marathi News Live Update : लोकसभा अधिवेशनापूर्वी भाजपची खलबतं

Lavani Gaurav Awards 2024 : पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान! यंदाचे लावणी गौरव पुरस्कार जाहीर

NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

SCROLL FOR NEXT