आईला कशाला मारहाण करता म्हणत मुलानचं केला जन्मदात्याचा खून

वाद इतका विकोपाला गेला अजितने बापाच्या डोक्यात जड लोखंडी वस्तूने वर्मी घाव केला.
Bhikaji vagare
Bhikaji vagareEsakal

बोरपाडळे (कोल्हापूर) : माले, ता.पन्हाळा (Male,Panhala)येथील भिकाजी शंकर वगरे (वय ४७ ) यांचा (Bhikaji vagare) त्यांच्याच मुलाने डोक्यात लोखंडी जड वस्तूने वर्मी घाव करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. खुनाबद्दल आरोपी मुलगा अजित भिकाजी वगरे (वय २४) (Ajit Vagare)याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी कि, मयत भिकाजी यांचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबध असल्याच्या विचारणा केल्याच्या कारणातून त्यांचे व त्यांची पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे. गेल्या काही महिन्यापूर्वी याच कारणावरून मुलगा आणि बापामध्येही वाद झाला होता.

Bhikaji vagare
सत्ताधारी, NCP च्या राजकीय गोंधळात इस्लामपूरचाच ‘करेक्ट कार्यक्रम’

गुरुवारी दि.९ डिसेंबर रोजी रात्री मयत भिकाजी यांना त्यांच्या पत्नीने तुझे गावातील महिलेशी अनैतिक संबध आहेत. याची विचारणा केली असता भिकाजी यांनी पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आईला कशाला मारता असे विचारल्याने आरोपी अजित आणि मयत भिकाजी यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला कि आरोपी अजितने चिडून बापाच्या डोक्यात जड लोखंडी वस्तूने वर्मी घाव केला. त्यातच ते खाली कोसळले. त्यानंतर सी.पी.आर. कोल्हापूरमध्ये उपचारासाठी दाखल केले असता रात्री उशिरा गंभीर जखमी भिकाजी यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिसांनी संशयित आरोपी अजित वगरे याचा रात्रभर शोध घेऊन पहाटे त्यास अटक केली. गेल्या दोन वर्षाभरामध्ये माले गावातील हा तिसरा खून असून यामध्ये २ महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. मुलाकडून जन्मदात्या वडिलांचा खून झाल्याने मालेसह परिसरात एकच खळबळ तर उडाली. शिवाय दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत होती. मयत भिकाजी यांच्या पश्चात आई, पत्नी, आरोपी मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

घटनेची फिर्याद पोलिस पाटील सुवर्णा हिरवे यांनी दिली असून, पुढील तपास कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड,उपनिरीक्षकसागर पवार आणि कर्मचारी करत आहेत. घटनास्थळाला शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल साळोखे यांनी भेट देवून माहिती सूचना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com