changing trends of school trips in kolhapur marathi news
changing trends of school trips in kolhapur marathi news 
कोल्हापूर

शालेय सहली नव्हे, ‘स्टडी टूर’...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शालेय सहलींचा हंगाम सुरू झाला असून, या सहली आता केवळ स्थलदर्शनापुरत्या मर्यादित न राहता त्यांना ‘स्टडी टूर’चे स्वरूप आले आहे. काही शाळांतील शिक्षकांनी संस्था व पालकांच्या संमतीने जाणीवपूर्वक या संकल्पनेवर भर दिला असून, बस आणि रेल्वे प्रवासाबरोबरच आता विमानाचा प्रवासही विद्यार्थ्यांना घडवून आणला जात आहे. 

बस, रेल्वे प्रवासानंतर आताविद्यार्थ्यांचा विमान प्रवासही

वर्षातून एकदा शालेय सहली निघत असल्या तरी काही नियम आणि अटींचे पालन करून त्या काढाव्या लागतात. मात्र, पालक आणि संबंधित संस्थांच्या परवानगीने काही उपक्रमशील शिक्षकांनी अभ्यास सहलींवर भर दिला आहे. 
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. लोहिया हायस्कूलने विशेषतः दहावीच्या मुलांसाठी, संजय घोडावत ग्रुपसारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांनीही अशाच सहलीवर भर दिला आहे. दहावीनंतर पुढे कोणत्या क्षेत्रात करियरच्या संधी आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांना दहावीचे शिक्षण घेत असतानाच मिळावी, या उद्देशाने या संकल्पनेवर भर दिला असल्याचे सागर बगाडे यांनी सांगितले. प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी संचलित शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालयातील चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींची प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्राचीन स्थळांसह गुऱ्हाळघरांवर सहली जातात. आपल्याच जिल्ह्यातील या गोष्टींची मुलांना सर्वांगाने माहिती व्हावी, यासाठी याचे आयोजन होते. सहलीपूर्वी या संपूर्ण गोष्टींची माहिती प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून मुलांना सांगितली जाते आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जावून मुलांची उजळणी करून घेतली जाते, असे शिक्षक लालासाहेब पाटील सांगतात. सहलींच्या बदलत्या ट्रेंडची ही काही प्रातिनिधीक उदाहरणे.   

संचलन सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव उत्तूर विद्यालयातील मुलांची सहल काल शिक्षकांसह दिल्लीकडे रवाना झाली. ही मुले २६ जानेवारीला दिल्लीमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनाचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवणार आहेत.  

यंदा दिल्ली सहल काढताना विमान प्रवासही घडवून आणणार आहे. चार महिने विविध परवानग्यांसाठी प्रयत्नशील होतो. मथुरा, वृंदावन, फतेहपूर सिक्री, आग्रा येथे विद्यार्थी भेट देतील. परतताना दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करतील. रेल्वे, विमान प्रवास कसा असतो, याची जाणीव मुलांना व्हावी, हाही त्यामागील हेतू आहे. चिमणे (ता. आजरा) येथील कर्मवीर विद्यालयाने यापूर्वी कोल्हापूर ते मुंबई असा विमानप्रवास घडवून आणला होता. 
- इंद्रजित बंदसोडे, शिक्षक, उत्तूर विद्यालय
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT