Cleaning campaign tomorrow Panchganga Ghat
Cleaning campaign tomorrow Panchganga Ghat sakal
कोल्हापूर

जलदिंडीद्वारे प्रदूषणमुक्तीची सुरुवात, पंचगंगा घाटावर उद्या स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रदूषणाच्या विळख्यात पंचगंगेचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी ‘पुन्हा साथ देऊया...चला, पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेंतर्गत उद्या राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीने पंचगंगा प्रदूषणमुक्तीला प्रारंभ होणार आहे. समाजातील विविध संस्था, संघटनांबरोबरच शासनाची सर्व यंत्रणाही यात सहभागी असेल.

पिरळ (ता. राधानगरी) येथून सकाळी आठला जलदिंडीला प्रारंभ होईल आणि नदीकाठच्या गावांचे स्वागत स्वीकारत, त्या-त्या परिसरात प्रदूषणमुक्तीचा जागर करीत जलदिंडी इचलकरंजीकडे रवाना होईल. दरम्यान, जलदिंडी मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी आपापल्या परिसरातच उपस्थित राहून जलदिंडीचे स्वागत करावे, असे आवाहन करण्यात आले.

पिरळ येथून पहिली टीम जलदिंडीला प्रारंभ करेल. त्यानंतर दहाच्या सुमारास हळदी (ता. करवीर) येथून दुसरी टीमही जलदिंडीला प्रारंभ करेल. दोन्ही टीम नदीमार्गातील गावांचे स्वागत स्वीकारत सायंकाळी शिंगणापूर येथे येतील. शुक्रवारी सकाळी साडेसातला जलदिंडी शहरातील पंचगंगा घाटावर येईल. येथे स्वच्छता मोहीम, जलदिंडीचे स्वागत व जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली जाईल. यानिमित्त हजारो कोल्हापूरकर एकवटणार असून, शंभरहून अधिक संस्था, संघटनांसह तालमी व महाविद्यालये मोहिमेत सक्रिय सहभागी होतील. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती असेल. त्यानंतर राजाराम बंधारामार्गे जलदिंडी इचलकरंजीकडे रवाना होईल.इचलकरंजी येथे सायंकाळी पाचला मुख्य सांगता सोहळा होईल.

‘सकाळ’बरोबर या संस्था

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस प्रशासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT