Corona free to kolhapur Kalamba jail
Corona free to kolhapur Kalamba jail 
कोल्हापूर

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून कोरोना झाला आउट

राजेश मोरे

कोल्हापूर - कळंबा कारागृहाची कोरोनामुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. बाधित ८४ बंदी कोरोनामुक्त झाले. तात्पुरते कारागृहाच्या मदतीतून योग्य वेळी केलेल्या तपासण्या, औषध उपचारासह प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेचे हे फलित ठरले आहे.  

राज्यातील अनेक कारागृहांत कोरोनाचा शिरकाव झाला. हा संसर्ग वाढू नये, यासाठी  सात वर्षाच्या आतील शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील बंदी व न्यायालयीन बंदींना न्यायालयाच्या परवानगीने पॅरोल व जामिनावर सोडले. कळंबा कारागृहातील चारशेहून अधिक बंदी यातून घरी गेले. उपाययोजना करूनही कळंबा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला. 

तात्पुरते कारागृह
नव्याने दाखल होणारे बंदीमुळे संसर्ग वाढण्याचे धोके निर्माण होऊ शकतात. याचा विचार करून ‘आयटीआय’तील मुलांच्या वसतिगृहात तात्पुरते कारागृह सुरू केले. नव्याने दाखल होणारे सर्व बंदीची तपासणी करून त्यांना येथे १४ दिवस ठेवले जाते. तेथून त्यांना बिंदू चौक सबजेलमध्ये व ठराविक काळानंतर कळंबा कारागृहात हलविण्यात येते. या कारागृहाला ‘कोविड केअर सेंटर’ म्हणून प्रशासनाने मान्यता दिली. येथे महापालिका आयुक्तांनी एक डॉक्‍टर, औषधे, पीपीई किट, हेड शिल्ड अशी आवश्‍यक यंत्रणाही पुरवली आहे. 

व्हिडिओ कॉलींगची सुविधा
संपर्क टाळण्यासाठी कळंबा कारागृहातील मुलाखती बंद केल्या आहेत. गरजेवेळी नातेवाईक व न्यायालयीन कामासंदर्भात वकिलांशी व्हिडिओ कॉलींगद्वारे भेट घालून दिली जात असल्याचे शेळके यांनी सांगितले. 

बाधित झालेले ८४ बंदी कोरोनातून मुक्त झाले आहेत. कारागृहात मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात येत असून, निर्जंतुकीकरणावरही भर दिला जात आहे. 
- शरद शेळके, अधीक्षक, कळंबा कारागृह.


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT