बेळगाव - कोरोना बाधित आरोपीला अटक केल्याने कॅम्प पोलिस ठाणे सील झाल्याची घटना ताजी असतानाच काकती पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीला देखील कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
या आरोपीचा अहवाल बुधवार ता.7) पॉझिटिव्ह आल्याने पोलिस खात्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून काकती पोलिस ठाणे देखील सील होण्याची शक्यता आहे. तसेच काही पोलिसांना देखील होम क्वाॅरंटाईन करण्यात येणार असल्याचे समजते.
सोडचिठ्ठी दिलेल्या पहिल्या पत्नीच्या अंगावर कारगाडी घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काकती पोलिसांनी वीरभद्रनगर येथील एका संशयिताला अटक केली होती. मात्र, त्याला आता कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन सायंकाळी काकती पोलिस ठाण्याला भेट देऊन माहिती घेणार आहोत.
हे पण वाचा - बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची दहावीच्या निकालात का होते घसरण ? यंदा तरी निकालाचा टक्का वाढणार का ?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.