Corona positive patient found in gadhinglj taluka
Corona positive patient found in gadhinglj taluka 
कोल्हापूर

कोरोनाची गडहिंग्लज तालुक्यात 'अशी' झाली इन्ट्री...

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज - शेजारच्या कर्नाटक सीमेवरील संकेश्वरसह आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. पण, गडहिंग्लज तालुक्याची पाटी कोरीच होती. त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होते. अशातच आज कवळीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथील ३५ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त धडकले आणि तालुक्यात खळबळ उडाली. अखेर गडहिंग्लजचे खाते उघडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खबरदारी म्हणून गावच्या सीमा बंद

कवळीकट्टी गाव कर्नाटक सीमेवर आहे. सदरचा युवक सात दिवसांपूर्वी मुंबईवरुन आला आहे. तो शिक्षक असल्याचे समजते. येथील शेंद्री रोडवरील कोव्हिड केअर सेंटरमध्ये स्वॅब घेतल्यानंतर त्याला गावातील माध्यमिक शाळेत उभारलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले होते. आज सकाळी त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने हालचाली करीत खबरदारी म्हणून गावच्या सीमा बंद केल्या आहेत.
दरम्यान, हारुर (ता. आजरा) येथे मुंबईवरुन आलेल्या माय-लेकांना कोरोनाची लागत झाली होती. त्यांच्या संपर्कात गडहिंग्लज येथील सात नातेवाईक आले होते. सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारीच (ता. १५) त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे गडहिंग्लजकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. पण, आज सकाळी कवळीकट्टी येथील युवक पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 सोबत पाच जणांचा प्रवास...

मुंबईवरुन सदर युवकासोबत त्याची पत्नी, मुलगी आणि गावातीलच आणखी एका कुटुंबातील तिघांनी प्रवास केला आहे. या पाच जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

गडहिंग्लजला एकच रुग्ण...

सुरवातीला गडहिंग्लज तालुक्यात दोन रुग्ण आढळले असल्याचे सांगितले जात होते. सोशल मीडियावर गावासह दुसऱ्या रुग्णाची चर्चा होती. पण, तो रुग्ण शाहुवाडी तालुक्यातील निघाला. गावातील नावात साधर्म्य असल्याने हा गोंधळ झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid: सिंगापूरनंतर भारतातही परसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

Nigeria Firing: अमानुष! बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात ४० लोक ठार; पीडित म्हणाले, त्यांनी आमची...

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

SCROLL FOR NEXT