Corona in Shastringarh; 28 quarantine
Corona in Shastringarh; 28 quarantine 
कोल्हापूर

शास्त्रीनगरात पती-पत्नीला कोरोना; 28 जण क्वारंटाईन 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शास्त्रीनगर परिसरातील सरनाईक वसाहत येथे काल रात्री पती-पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी हा भाग सील केला. संबंधिताच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कात आलेल्या 28 जणांना क्वारंटाईन केल्याचे सांगण्यात आले. 

शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत आहे. उपनगरातील रहिवाशांना नजीकच्या काळात सतर्कता बाळगावी लागणार आहे. रुग्ण संख्या पन्नासच्या घरात गेली आहे. सरनाईक वसाहत येथील रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. काल रात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

संबंधिताची ये-जा कर्नाटक राज्यातून होत असल्याची माहिती आहे. पती-पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने काल रात्री महापालिकेने तातडीने पावले उचलली. बॅरिकेडस लावून परिसर सील केला. औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. रात्री दोन वाजेपर्यंत संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू होते. संबंधितांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. संपर्कात आल्याच्या संशयावरून 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. 

सरनाईक वसाहत हा परिसर दाटीवाटीने वसला आहे. गेल्या वर्षी याच परिसरात डेंगीचे रुग्ण आढळून आले होते. नगरसेवक भूपाल शेटे, जावेद जमादार, मोहसीन खान, मुजिफ महात, वाशीम आकिवाटे यांनी यंत्रणा लावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT