Crocodile Sightings On The Banks Of The River Hiranyakeshi Kolhapur Marathi News
Crocodile Sightings On The Banks Of The River Hiranyakeshi Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

हिरण्यकेशी नदीकाठावर मगरीचे दर्शन

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी नदीकाठावर मगरीचे दर्शन घडले. साडेसात ते आठ फूट लांब असणाऱ्या या मगरीच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्‍वभूमीवर दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

हिरण्यकेशी नदीत मगरींचा वावर वाढला आहे. निलजी, हेब्बाळ, नूल, कडलगे, खणदाळ परिसरांत यापूर्वी मगरीने दर्शन दिले होते. आज सकाळी नांगनूरजवळ तिचे दर्शन घडले. नांगनूर-गोटूर बंधाऱ्याजवळ रायगोंडा नार्वेकर यांचे शेत आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास ते गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मगरीचे दर्शन झाले.

सुमारे साडेसात ते आठ फूट लांबीची ही मगर अर्धा तास नदीकाठावर होती, तर दुपारी दोनच्या सुमारास संकेश्‍वर हद्दीतील डॉ. भिडे यांच्या शेतात ती दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या कर्मचाऱ्यांनासुद्धा मगरीचे दर्शन घडले. या पथकात वनपाल बी. एल. कुंभार, वनरक्षक रणजित पाटील, आर. आर. नाईक, नागेश खोराटे यांचा समावेश होता. मगरीचा वावर असल्याने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT