Distribution of KMT students staff senior citizens disabled and blind concession passes started
Distribution of KMT students staff senior citizens disabled and blind concession passes started 
कोल्हापूर

के.एम.टी.चे विद्यार्थी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व अंध सवलत पास वितरण सुरु 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - के. एम. टी. उपक्रमामार्फत सुरू असणाऱ्या विविध सवलत पासचे वितरण कोविड-19 अंतर्गत माहे मार्च 2020 पासून बंद करणेत आले होते. गुरुवारी(ता.5) पासून विद्यार्थी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंध सवलत पासचे वितरण नियमित सुरु करणेत येत आहे. 

विद्यार्थी, कर्मचारी व श्री महालक्ष्मी सवलत पास सकाळी 9.00 ते सायं.6.00 वा.पर्यंत श्री शाहू क्‍लॉथ मार्केट येथील के.एम.टी. मुख्य कार्यालयाजवळील पास वितरण केंद्र येथून वितरीत करणेत येतील. तसेच दिव्यांग, अंध व 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक यांचे सवलत पासचे वितरण के.एम.टी.च्या मुख्य कार्यालयात सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत आवश्‍यक ते कागदपत्र जमा करुन घेऊन, सायंकाळी 4.00 ते 5.00 या वेळेत पास वितरीत करणेत येईल. 

सध्या के.एम.टी. उपक्रमाकडून टप्प्याटप्याने शहरांतर्गत व पेठ वडगांव, कागल, रुकडी-माणगांव, गांधीनगर या ठराविक मार्गांवर मर्यादित स्वरुपात बस सेवा सुरु करणेत आली आहे. प्रवासी नागरिकांनी उपलब्ध बस सेवा विचारात घेऊन त्यांच्या गरजेनुसार सवलत पासेस खरेदी करावेत, असे आवाहन परिवहन समिती सभापती चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT