Don't be fooled by fake degrees
Don't be fooled by fake degrees 
कोल्हापूर

बनावट पदवीला फसू नका

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर ः बी.एड आणि एम.एड ची पदवी 60 हजार रुपयांमध्ये मिळेल अशी पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाली होती. याची खात्री केल्यानंतर आज विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली आहे. याचा तपास सायबर सेल करणार असून अशा प्रकारच्या कोणत्याही संदेशावर विश्‍वास ठेऊ नये असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. 
बी.एड. आणि एम.एड.ची पदवी 60 हजारांत मिळेल, अशी पोस्ट सोशल मीडियावरून चार दिवसांपासून व्हायरल झाली होती. या पोस्टची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन केला. त्यावरून पोस्ट टाकणारी व्यक्ती नांदेडची असून त्या व्यक्तीने विद्यापीठाची बनवाट डिग्री देत असल्याचे मान्य केले. तसेच भविष्यात काही अडचण आल्यास मी जबाबदार नाही असेही सांगितले. या पोस्टमुळे विद्यापीठात खळबळ उडाली. प्रभारी परीक्षा नियंत्रकांनी अशा कोणत्याही पोस्टवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहनही केले. 
दरम्यान आज विविध संघटना, संस्थांनी विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत पोलिस तक्रार द्यावी असे निवेदन दिले. दुपारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सायबर पोलीस याबाबतचा तपास करणार आहेत. 

शिवाजी विद्यापीठासह अन्य विद्यापीठाची बनावट डिग्री मिळेल या आशयाचा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. विद्यापीठ प्रशासनाने संदेशाची खात्री केली. या पोस्टमध्ये अज्ञात व्यक्तीचा हात असल्याचे समोर आले. आज याबाबत प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोस्टच्या अनुषंगाने या व्यक्तीशी कोणीही कोणताही व्यवहार करू नये. या पोस्टवर विश्‍वास ठेऊ नये. 
- डॉ.विलास नांदवडेकर (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ) 

मोठ्या रॅकेटची शक्‍यता 
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी पोस्टमधील क्रमांकावर फोन केला. यावेळी शिवाजी विद्यापीठाबरोबरच दुसऱ्या विद्यापीठांच्याही पदवी देऊ शकतो असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे या व्यक्तीने बऱ्याच जणांना बनावट पदवी दिल्याची शक्‍यता आहे. तसेच यामागे मोठे रॅकेट कार्यरत असू शकते. 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT