Drainage water directly into the house type in Rajarampur
Drainage water directly into the house type in Rajarampur 
कोल्हापूर

राजारामपुरीत ड्रेनेजच्या पाणी थेट घरात प्रकार

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर ः रोजगाराच्या शोधात स्थलांतर होऊन आलेला एक मजुर सुरक्षारक्षकाचे काम राजारामपूरीत करतो. त्याच अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये तो आपल्या कुटुंबकबिल्यासह राहतो. शेजारीच ड्रेनेज फुटले आणि ड्रेनेजच्या पाण्याने त्याचे घर भरले. हे पाणी काढा म्हणून त्याने आर्जवा, विनंत्या केल्या. पण महापालिकेचा ड्रेनेज विभाग म्हणतो हे पाणी पुरवठा विभागाचे पाणी आहे तर पाणीपुरवठा विभाग ड्रेनेज विभागाचे नाव घेतो. या गोंधळात त्या कुटुंबाचे आरोग्यच नव्हे तर जगणंच धोक्‍यात आल्याचे चित्र गेले वीस दिवस आहे. 

बसवराज कट्टी राजारामपुरी नवव्या गल्लीत एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतात. व बेसमेंटमध्ये राहतात. गटरचे पाणी त्यांच्या घराभोवती साचते. सकाळी ते दारात येते. त्यामुळे त्यांचा जाण्या येण्याचा मार्गच रोखला जातो. याची तक्रार महापालिकेकडे केली. त्यांना पाणीपुरवठा विभागात जा, असे सांगितले. पाणीपुरवठा विभागाने त्या पाण्याचा आमचा काही संबध नाही म्हणून उडवून लावले. तर ड्रेनेज विभागानेही हे पाणी आमचे नाही म्हणून नकारघंटा वाजवली. जायचे कोठे असा त्यांना प्रश्‍न पडला आहे. 
सकाळी सहा वाजता ड्रेनेज मधून दुर्गंधीयुक्त पाणी येते. बेसमेंटमध्ये जास्त पाणी साचल्यास हे पाणी मोटारीने बाहेर पुन्हा गटरात सोडतात. मात्र दुपारी बारापर्यंत हे पाणी बेसमेंटमध्ये वाहत असल्यामुळे सकाळचा संपुर्ण वेळ त्यांचा पाणी बाहेर काढण्यात जातो. या परिसरात सुरू असलेले ड्रेनेजचे काम लवकर पुर्ण व्हावे, अशी त्यांची मागणी आहे. 


सकाळी पाणी दारात येत असल्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत हे पाणी बाहेर काढतो. पाण्यासोबत इतर कचराही येत असल्याने मोठी दुर्गंधी सुटते. पाणीपुरवठा विभाग व ड्रेनेज विभागाकडे तक्रार होऊनही गेले वीस दुर्लक्ष झाले आहे. 
- बलवराज कट्टी, सुरक्षारक्षक

-संपादन - यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT