Due to the corona, the devotee fails to bathe
Due to the corona, the devotee fails to bathe 
कोल्हापूर

कोरोनामुळे भाविक मुकले स्नानाच्या पर्वणीला

जितेंद्र आणुजे

नृसिंहवाडी  ः श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज या मोसमातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा झाला. दुपारी कृष्णा नदीतील पाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत पाण्याची पातळी कमी झाली त्यालाच उत्तर-दक्षिण सोहळा असे म्हणतात. 
5 ऑगस्टला रात्री मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून दत्त मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना स्नानसोहळ्याचा आनंद घेता आला नाही. 

दरम्यान कोयना धरण पात्रातील पाणी क्षमता वाढत असून दरवाजातून विसर्ग बंद असल्यामुळे आज मोसमातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा सकाळी सात ते नऊ या वेऽेत झाला. उतरता दक्षिणद्वार सोहळ्यामुळे मंदिराभोवतालचे पाणी हळूहळू कमी होत असून श्रींच्या पादुका खुल्या झाल्या आहेत. सेवेकरी आपल्यापर्यंत श्रींची सेवा करण्यात मशगुल आहेत. दत्त देवस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची स्वच्छता करण्याचे नियोजन केले आहे. संध्याकाळची पूजा मुख्य मंदिरात पाणी बसल्यानंतर नित्यनेमाने मनोभावे पूर्ण झाली.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT