Ethanol production at a loss
Ethanol production at a loss 
कोल्हापूर

इथेनॉल निर्मितीच तोट्यात

निवास चौगले

कोल्हापूर : साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉलकडे वळा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले असले तरी साखर व उसाच्या एफआरपीच्या दराच्या तुलनेत इथेनॉलचे दर वाढले तरच हा धंदा फायद्याचा आहे, अन्यथा तो तोट्यात जाणार आहे. 


15 दिवसांत इंधनाचे दर प्रती लिटर 10 रुपयांपर्यंत वाढले; पण त्या तुलनेत इथेनॉलच्या दरात वाढ झालेली नाही. परिणामी, इथेनॉलपेक्षा साखर उत्पादनच बरे, अशी मानसिकता कारखानदारांची आहे. 


दोन दिवसांपूर्वी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या व्हर्च्युअल रॅलीत श्री. गडकरी यांनी थकीत एफआरपीवर मार्ग काढण्यासाठी कारखानदारांना इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर सद्यःस्थितीत कारखानदारांशी बोलून याची माहिती घेतली असता हा धंदा तोट्यात जाण्याचीच जास्त शक्‍यता असल्याचे मत व्यक्त झाले. 

इंधनात 10 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी परवानगी आहे. प्रत्यक्षात यापैकी पाच ते सहा टक्केच इथेनॉल मिश्रण केले जाते. त्यातही यासाठीच्या तेल कंपन्यांच्या अटी, शर्थी जाचक आहेत. कंपन्यांकडून यासाठी डिपॉझिट मागितले जाते. त्याचबरोबर हे इथेनॉल ठराविक ठिकाणी पोचवण्याची अट घातली जाते. कोल्हापुरातील कारखानदारांनी नागपूरमध्ये इथेनॉल पुरवणे अशक्‍य आहे, त्यापेक्षा मिरज येथे ते पुरवठा केल्यास त्याचा फायदा कारखानदारांना होईल. यासारख्या जाचक अटी शिथिल करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निश्‍चित धोरणाची आवश्‍यकता आहे. मुळात पेट्रोलसाठी लागणारे क्रुड ऑईल भारतात आयात केले जाते. त्यासाठी वर्षाकाठी तब्बल 1 लाख कोटींचे परकीय चलन द्यावे लागते. त्यापेक्षा इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवले आणि दर वाढवले तर हे परकीय चलनही वाचेल. 

दृष्टिक्षेपात इथेनॉलचे दर (प्रती लिटर दर) 
*सी मोलॅसिस ः 43.40 
*बी हेवी मोलॅसिस ः 52.43 
*उसापासून इथेनॉल ः 59.19 

दृष्टिक्षेपात इथेनॉल निर्मिती 
*इथेनॉल निर्मिती कारखाने ः 117 
*वार्षिक उत्पादन क्षमता ः 160 कोटी लिटर 
*2018-19 मधील मागणी ः 84 कोटी लिटर 
*प्रत्यक्षात कंपनीकडून खरेदी ः 68 कोटी लिटर 
*2019-20 ची मागणी ः 72 कोटी लिटर 
*प्रत्यक्षात झालेले करार ः 22 कोटी लिटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT