Even After Quarantine, The Door Of The House Is Closed Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

क्वारंटाईन संपले तरी घरचे दार बंदच

अजित माद्याळे

गडहिंग्लज : पुणे, मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतून आपल्या गावाकडे येणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात हजारोंच्या घरात पोहचली आहे. स्वॅब तपासणीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. याशिवाय अहवालही विलंबाने येत आहेत. त्यामुळे अनेक लोक स्वॅब तपासणीविना आणि स्वॅब देऊनही अहवाल आले नसताना त्यांना गावाकडे सोडले जात असून शाळेत क्वारंटाईन केले जात आहे. त्यांचे निगेटिव्ह अहवाल आल्याशिवाय संस्थात्मक अलगीकरण संपले असले तरी कोणाचीही शाळेतून सुटका होणार नाही. त्यामुळे घरच्या ओढीने आलेल्या चाकरमान्यांना अहवालाशिवाय आपल्या घरची दारे बंदच राहणार आहेत. 

दहा मे पूर्वी जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोरोनामुक्त होते. कोरोना रोखण्यात यश मिळाल्याच्या भावनेने सारेच निश्‍चिंत होते; परंतु कामगारांना शासनाने आपापल्या घरी जाण्यास परवानगी दिल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच जिल्ह्यातील कोरोनाचा नकाशा बदलला. अवघ्या आठवडाभरातच रुग्ण संख्येने अर्धशतक गाठले. चाकरमानी आल्यानंतर थेट स्वॅब तपासणी केंद्रावर धडक देतात.

मुळात प्रवास करून वैतागलेले चाकरमानी या केंद्रातील गर्दी पाहून हैराण होत आहेत. त्यामुळे स्वॅब न देताच काही लोक थेट गावाकडेही जात आहेत. अचानक झालेल्या गर्दीमुळे क्वारंटाईनच्या प्रशासकीय मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे स्वॅब घेणे शिल्लक असलेल्या चाकरमान्यांना टोकण दिले जात आहे. दिलेल्या तारखेला स्वॅब टेस्टला येण्यास सांगितले जात आहे. स्वॅब घेतलेल्यांना अहवाल येण्यापूर्वीच थेट गावात पाठवून शाळेत क्वारंटाईन होण्याच्या सूचना आहेत. या प्रकाराने गावांसाठी धोक्‍याची घंटा मिळत आहे. म्हणून प्रशासनाने गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. 

शाळेत क्वारंटाईन झालेल्या प्रत्येकाची स्वॅब टेस्ट झाली की नाही याची खात्री करण्यास सांगितले गेले आहे. इतकेच नव्हे, तर स्वॅब घेतलेले, न घेतलेले आणि अहवाल प्रलंबित असलेल्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. विशेष करून आरोग्य विभागाला याची पाहणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या यंत्रणेवर टोकण दिलेल्या व्यक्तींना ज्या त्या तारखेला स्वॅब टेस्टला पाठविण्याची जबाबदारी दिली आहे. स्वॅब टेस्ट झाली असली तरी अहवाल येण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय त्यांची शाळेतून सुटका करू नये, असे सक्त आदेश दिले आहेत. संबंधितांना कोणतीही लक्षणे नसली तरी ती व्यक्ती पॉझिटिव्ह असू शकते. तसे झाल्यास संसर्गामुळे संपूर्ण गाव धोक्‍यात येऊ शकते. 

कळवीकट्टे प्रकाराचा अनुभव 
गडहिंग्लजमध्ये कळवीकट्टे गावात आढळलेला एक रुग्ण अशाच प्रकारे शाळेत क्वारंटाईन होता. अहवाल आला नसतानाही त्याला घरी सोडण्यात आले. घरी गेलेल्या दुसऱ्या दिवशीच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचे घर अलिप्त असल्याने संसर्गाचा धोका टळल्याचे चित्र आहे. कळवीकट्टेचा हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाल्याचे सांगण्यात येते. 

स्वॅबसाठी सूचना
रेड झोनमधून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वॅब घेतल्याशिवाय व त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्याशिवाय त्यांचे संस्थात्मक अलगीकरण संपवू नये. अनेक लोक स्वॅब न देताच गावी आले आहेत. त्यांचीही यादी तयार करून त्यांना स्वॅबसाठी पाठवून देण्याच्या सूचना आहेत. 
- दिनेश पारगे, तहसीलदार- गडहिंग्लज. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT