

Radhika Narale from Solapur runs 5 km in the 10K marathon while pregnant, inspiring thousands with her courage.
Sakal
सोलापूर : सकाळची थंड हवा आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात सोलापूरमध्ये पहिल्यांदाच ‘१० के रन’ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व नागरिक मोठ्या आनंदाने आणि जोशाने या स्पर्धेत सहभागी झाले. या सोबतच पोटात सहा महिन्यापासून वाढणाऱ्या तान्हुल्याला घेऊन राधिका नरळे यांनी मॅरेथॉनमध्ये धावून नव्या पिढीला प्रेरणादायी संदेश दिला. याला त्यांचे पती सुशांत नरळे यांनी खंबीर साथ दिली.