Everest Veer Kasturis.
Everest Veer Kasturis. Sakal
कोल्हापूर

एव्हरेस्टवीर कस्तुरीचा परतीचा ७५ किमीचा प्रवास चालतच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - येथील युवा गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिने नुकताच माउंट एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकवला. त्यानंतर ती एव्हरेस्टच्या बेसकॅम्पवर पोचली; पण तेथून लुक्ला (नेपाळ) येथे येण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्याने तिने चालतच परतीचा प्रवास सुरू केला आहे. लुक्ला येथे पोचण्यासाठी ७५ किलोमीटरचा प्रवास करत तिला तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.

अनेक अडचणींवर मात करत कस्तुरीने एव्हरेस्टची मोहीम फत्ते केली; पण तिच्या कुटुंबीयांना आणखी बावीस ते तेवीस लाखांचा निधी जमवावा लागणार आहे. ती कोल्हापुरात परतण्यासाठी आणखी किमान दहा ते पंधरा दिवस लागतील; पण त्यानंतरही सावेकर कुटुंबीयांसमोर आर्थिक ताण कायम राहणार आहे. ज्यांना कस्तुरीसाठी अजूनही मदत करण्याची इच्छा आहे, त्यांनी दीपक सावेकर (९८२२६८१००५) यांच्याशी संपर्क साधावा.

आव्हान आर्थिकच

हेलिकॉप्टरसाठी पन्नास हजार रुपये खर्च आहे आणि तत्काळ इतकी रक्कम उभी करणे अशक्य असल्याने ती चालतच लुक्लाकडे निघाली आहे. अन्नपूर्णा, एव्हरेस्टच्या यशानंतर ती जवळच असलेल्या जगातील चौथ्या क्रमांकाचे लोत्से शिखर सर करणार होती; पण एकूणच आर्थिक स्थिती पहाता तिने ही मोहीम रद्द केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT